धानाच्या बाेनसची रक्कम देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:07+5:302021-07-16T04:25:07+5:30
नवीन हंगामाची सुरुवात होऊनही मागील खरीप हंगामाच्या धानाचे बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. सहा महिन्यांचा कालावधी लोटला असल्याने आता ...

धानाच्या बाेनसची रक्कम देण्याची मागणी
नवीन हंगामाची सुरुवात होऊनही मागील खरीप हंगामाच्या धानाचे बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. सहा महिन्यांचा कालावधी लोटला असल्याने आता तरी बोनसची रक्कम द्यावी, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील वर्षी आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केला होता. हा बोनस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचा आहे; परंतु मागील खरीप हंगामाचे धान विकून सहा महिने लोटले तरीही बोनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असून, आता नवीन खरीप हंगामाच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे तथा बँकांचे दार ठोठवावे लागत आहे. यापूर्वी राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान जून २०२० अखेर कर्ज भरणाऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. वर्ष लोटले असून, अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही.