कऱ्हांडला येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी
By Admin | Updated: September 27, 2014 23:11 IST2014-09-27T23:11:11+5:302014-09-27T23:11:11+5:30
राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती होत आहे. विरली बु. येथे एकमेव वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेची शाखा आहे. त्या बँकेमध्ये कामाचा वाढलेला व्याप आणि कर्मचाऱ्याची कमतरता यामुळे सकाळी १० वाजता

कऱ्हांडला येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी
कऱ्हांडला : राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती होत आहे. विरली बु. येथे एकमेव वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेची शाखा आहे. त्या बँकेमध्ये कामाचा वाढलेला व्याप आणि कर्मचाऱ्याची कमतरता यामुळे सकाळी १० वाजता बँकेमध्ये गेलेला ग्राहक गर्दीमध्ये सायंकाळपर्यंत ताटकळत राहतो. व्यवहार दिरंगाईमुळे ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विरली बु. येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी नागरिकांनी केली आहे.
बँकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले पाचगाव, पालेपेंढरी गावापर्यंतचे ग्राहक जोडण्यात आलेले असल्यामुळे या एकमेव बँकेमध्ये गर्दीच गर्दी बघावयास मिळते. प्रत्येक कामासाठी बँकेचे खाते अनिवार्य झाला आहे.
प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसहाय राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये जमा होते. महिला बचत गटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसहाय्य गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाचा आर्थिक अर्थसहाय लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, सोने तारण इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेचे आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार असे एकंदरीत सर्वच व्यवहार बँकेमधून होत आहेत.
आॅनलाईन प्रक्रियेमुळे बँकेचे व्यवहार सोपे झाले आहेत. मात्र लिंक फेलमुळे सुविधा त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांची वाढलेली संख्या आणि आर्थिक व्याप लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे. (वार्ताहर)