शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

जलविद्युत निर्मिती केंद्राची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 00:36 IST

तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु ...

बावनथडी प्रकल्प : राजापूर वितरिकेचे काम अद्यापही थंडबस्त्याततुमसर : तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी केली आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असताना या प्रकल्पावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाली आहे. असे असले वायू पाणी व जमिनीचे प्रदूषण होणार असून पर्यावरणाच्या समस्याही उद्भवणार असल्याने भविष्यातील संकट लक्षात घेता औष्णिक विद्युत ऐवजी जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात शासनाच्या प्रतिनिधीकडे निवेदन पाठविली. जलविद्युत केंद्रामुळे या भागातील ग्राहकांना नियमित वीज पुरवठा होणार असून नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाची समस्या भेडसावणार नाही. त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. राजापूर वितरिकेचे काम अजूनही थंडबस्त्यातच असल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, राजापूर, सुंदरटोला, सितासावंगी, खंदाळ, गुढरी आदी गावातील शेतकरी बावनथडी प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. जेवढेही कार्य राजापूर वितरीकेचे करण्यात आले त्यात आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., लोभी या गावांचा समावेश आहे. या गावांपर्यंत नहराचे खोदकाम झाले असून त्यातही मोठमोठे भगदाड पडल्याने राजापूर वितरिका पूर्णत: निकामी ठरली. परिणामी परिसरातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना मोबदलाही अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाच्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवून प्रत्यक्षात शासनाच्या नजरेत आणून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचीही मागणी आष्टी जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)