लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली.गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी पिकांना मोठा फटका बसला. त्यात तूर, उडीद, मुंग, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्वीकारले. यावेळी नरेंद्र झंझाड, रामदास शहारे, महेंद्र गडकरी, डॉ. जगदीश निंबार्ते, डॉ. रविंद्र वानखेडे, नितीन तुमाने, सुमित घोगरे, राजपुत, स्वप्नील नशिने, सुनिल शहारे, राजू हाजी सलाम, यशवंत सोनकुसरे, विजय खेडीकर, भगीरथ धोटे, अनिल सुखदेवे, राजू हेडाऊ, हेमंत महाकाळकर, लोकेश नगरे, संजय सतदेवे, उमेश ठाकरे, किरण कुंभरे गणेश बानेवार, किशोर इंगळे, आहुजा डोंगरे, जुगल भोंगाडे, महेश जगनाडे, सोनु कनोजे, प्रशांत सरोजकर, अक्षय झंझाड, पंकज काळे, पंकेश काळे, भानुदास बनकर, महेंद्र बारपात्रे, नितीन खेडीकर, किशोर कळंबे, राहुल वाघमारे, मोनु गोस्वामी, सुनिल मोगरे, हिमांशु मेंढे, अरुण अंबादे, शेषराव लिमजे, सुनिल रामटेके, मोहीत पाठेकर रवी लक्षणे, अबरारभाई आदी उपस्थित होते. आता शासन काय निर्णय घेते आणि शेतकºयांना मदत देते काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:19 IST
जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १५ हजार रुपये देण्यासाठी राष्ट्रवादीचे निवेदन