शास्त्री चौकातील दुकाने फूटपाथधारकांना कमीतकमी किमतीत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:14+5:302021-06-21T04:23:14+5:30

निवेदनानुसार, भंडारा शहरात इंग्रजांच्या काळापासून लालबहादूर शास्त्री या शाळेची इमारत आहे. जिल्ह्यातील ही नावाजलेली शाळा आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना ...

Demand to give shops at Shastri Chowk to sidewalk owners at minimum price | शास्त्री चौकातील दुकाने फूटपाथधारकांना कमीतकमी किमतीत देण्याची मागणी

शास्त्री चौकातील दुकाने फूटपाथधारकांना कमीतकमी किमतीत देण्याची मागणी

निवेदनानुसार, भंडारा शहरात इंग्रजांच्या काळापासून लालबहादूर शास्त्री या शाळेची इमारत आहे. जिल्ह्यातील ही नावाजलेली शाळा आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. कोरोना काळात या शाळेत अनेक रुग्णांना औषधोपचारासाठी ठेवण्यात आले होते. ही जागा सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे; मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी या जागेवर दुकानाचे गाळे बांधण्याचा घाट घातला. सदर दुकानाचे गाळे बांधण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या दुकानाच्या एका गाळ्याची किंमत ३० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. फूटपाथधारक दुकानदार हे गरीब असल्याने ते या दुकानांसाठी एवढी रक्कम देऊ शकत नाहीत. अनेक वर्षांपासून या ठिकाणी दुकान लावणारे फूटपाथधारक उघड्यावर पडणार आहेत. तेव्हा सदर दुकानाचे गाळे फूटपाथधारकांना कमीत कमी किमतीत देण्यात यावेत, अन्यथा या ठिकाणी दुकानाचे गाळे काढू नये. कारण इथे दुकानाची चाळ काढल्यानंतर सर्वात श्रीमंत व्यक्ती या ठिकाणी व्यवसाय करतील, परत सर्व फूटपाथधारक रस्त्यावर येतील. फूटपाथधारकांना न्याय मिळावा, यासाठी फुटपाथ शिवसेना संघटना,अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. फूटपाथधारकांची ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विश्‍वास लोणारे यांनी केली आहे.

Web Title: Demand to give shops at Shastri Chowk to sidewalk owners at minimum price