सेतु केंद्रात सुविधांची मागणी
By Admin | Updated: June 26, 2014 23:05 IST2014-06-26T23:05:45+5:302014-06-26T23:05:45+5:30
शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्याची झुबड उडाली आहे. मात्र वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रवेशावर गडांतर येण्याची शक्यता वाढली आहे. दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक

सेतु केंद्रात सुविधांची मागणी
भंडारा : शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्याची झुबड उडाली आहे. मात्र वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रवेशावर गडांतर येण्याची शक्यता वाढली आहे. दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेतु केंद्रात सुविधा पुरविण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना निवेदनातून केली आहे.
विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशासाठी तसेच शैक्षणिक कार्याकरिता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व नॉनक्रिमिनल प्रमाणपत्र यासारख्या दाखल्याची आवश्यकता असते. मात्र तहसील कार्यालयात हे दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तहसील प्रशासनाने विशेष व्यवस्था करावी. यासाठी खिडक्यांची वाढ करणे, शाळा महाविद्यालयात शिबिर लावणे, नायब तहसीलदारांची विशेष नियुक्ती करावी. प्रशासनाने याची तातडीने दखन न घेतल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
निवेदन देताना यशवंत टिचकुले, रमेश माकडे, राजकुमार खंडाळे, जितेंद्र गजभिये, रोशन मेश्राम, सेवकराम पंचबुद्धे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)