अतिक्रमण हटविण्याची मागणी
By Admin | Updated: May 16, 2016 00:32 IST2016-05-16T00:30:40+5:302016-05-16T00:32:38+5:30
प्रभाग क्र. ३ मध्ये असलेले रघुनाथ पिपरे ते प्रभू रुखने यांच्या घरापर्यंतच्या अतिक्रमणामुळे खा. प्रफुल पटेल यांच्या निधीतील विकास कामाला अडथळे येत असल्यामुळे....

अतिक्रमण हटविण्याची मागणी
पवनीतील प्रकार : पत्रपरिषदेत दिली माहिती
पवनी : प्रभाग क्र. ३ मध्ये असलेले रघुनाथ पिपरे ते प्रभू रुखने यांच्या घरापर्यंतच्या अतिक्रमणामुळे खा. प्रफुल पटेल यांच्या निधीतील विकास कामाला अडथळे येत असल्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत काढण्याची मागणी करून व वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन मुख्याधिकारी न.प. पवनी यांना दिल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे पवनी शहर अध्यक्ष सोनू कोरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे सोनू कोरेकर यांनी सांगितले की खा.प्रफुल पटेल यांच्या २०१५ - १६ मधील विकास कामाच्या निधी अंतर्गत रामपुरी वॉर्ड येथील प्रभू रुखने ते रघुनाथ पिपरे यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी लेआऊट घेण्याकरिता साबांविचे कर्मचारी मोक्यावर गेले असता या रस्त्यावरील जागेवर अतिक्रमण असल्यामुळे हे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरु करावे अन्यथा हे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे काम सुरु झाले नाही.
या संबंधाने साबांवि ने पत्र क्र. १६९ दि.१६ एप्रिल २०१६ ला पवनी नगर पालिकेला पत्र देवून या रस्त्यावर अतिक्रमण आहे का? याची शहानिशा करून जागा मोकळी करून द्यावी. त्यामुळे रस्त्याचे काम करणे सोईचे होईल असे कळविले आहे. पण न.प. पवनी ने अजूनपर्यंत कारवाई केली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत हटवावे अन्यथा वॉर्डातील नागरिक व भाजयुमो पवनी शहर आंदोलन करेल अशी माहिती भाजयुमोचे शहर अध्यक्ष सोनू कोरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेत सोनू कोरेकर, प्रभाकर रुखणे, राजेश रुखणे, लंकेश धकाते, प्रभू रुखणे, प्रशांत देवीकर, लालचंद देशमुख, देवीकर, योगेश निखारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)