राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By Admin | Updated: December 3, 2014 22:44 IST2014-12-03T22:44:45+5:302014-12-03T22:44:45+5:30
शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिल कार्यलयासमोर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकारने दुष्काळ जाहिर करुन व इतर मागण्यांचे

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पवनी : शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिल कार्यलयासमोर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकारने दुष्काळ जाहिर करुन व इतर मागण्यांचे निवेदन तहसिलदार नरेंद्र राचेलवार यांना देण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना तहसिलदार पवनीच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनामध्य,े या वर्षी अपुरा पाऊस व काही ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांचे तसेच मासेमारांचे मोठे नुकसान झाले. या स्थितीत धान व सोयाबीन उत्पादकांना नुकसानीचे हेक्टरी २५,००० रुपये दयावे, मच्छीमार संस्थाना हेक्टरी ५,००० रुपये दयावे, धानाला ३,०००, कापसाला ६,००० रुपये हमी भाव दयावा, ओलीत व फळबाग शेतकऱ्यांना ५०,००० रुपये दयावे व ५०० रुपये बोनस दयावा, शेतकऱ्याचे कर्ज विजबिल माफ करावे, मासेमारांची विज माफ करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
तसेच अहमदनगर जिल्हयातील जवखेडा येथील दलीत हत्याकांडाचा सीबीआय मार्फत तपास करुन आरोपींना अटक करावी, भाजपाने विधीमंडळात असंविधानीकरित्या विश्वासदर्शक ठराव जिंकला तो स्थगित करावा आदी मागण्यांही करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात बंडूभाऊ सावरबांधे तालुका अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, शहर अध्यक्ष शंकर मुनरत्तीवार, जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, मोहन पंचभाई, विजय सावरबांधे, शंकरराव तेलमासरे, विकास राऊत, निलेश सावरबांधे, श्रीधर रामटेके, शतरंज गजभिये, भंडारा लोकसभा क्षेत्राचे युकॉचे महासचिव आशिष माटे, जिल्हा मच्छी व्यावसाय सेलचे अध्यक्ष प्रकाश पचारे, अशोक मोहरकर, गोपाल सावरबांधे, तोमेश्वर पंचभाई, अमीत जिभकाटे, नरेंद्र बिलवणे, कोठीराम नान्हे, अंबादास धारगावे, राजेश भेंडारकर, निला पाथोडे, अशोक ब्राम्हणकर, हर्षा कावळे, गिता पंधरे, कांता सावरबांधे, दुर्गा भोयर, गोपाल भिवगडे, सुधाकर ठाकरे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)