मग्रारोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: May 10, 2014 00:17 IST2014-05-10T00:17:11+5:302014-05-10T00:17:11+5:30
केंद्र व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दूरदर्शन, रेडीओ, वर्तमानपत्रे, पोस्टर्स आदी विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसार व प्रचार करण्यासाठी ..

मग्रारोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
भंडारा : केंद्र व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दूरदर्शन, रेडीओ, वर्तमानपत्रे, पोस्टर्स आदी विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसार व प्रचार करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येतात. परंतु शासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता कुठलेही ठोस प्रयत्न होत नसल्याने मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी मजुरांचे परराज्यात पलायन होत आहे.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी, माडगी, धारगाव, राजेगाव आदी गावांतील मजुरीसाठी दुष्काळी परिस्थिती असूनही कामाविना ते वंचित आहेत. पर्यायाने त्यांच्याजवळ उदरनिर्वाह करण्याकरिता पुरेसा पैसा नाही. मोठय़ा प्रमाणात गाजावाजा करण्यात आलेली ही योजना धारगाव परिसरातील मजुरांसाठी वेदनादायी ठरली आहे. धारगाव परिसरात सिंचनाची सोय नसल्याने मोठय़ा प्रमाणात खरीप हंगामात हलक्या प्रतिच्या खरीप हंगामात हलक्या प्रतिच्या धानाची लागवड केली जाते.
ग्रामीण भागातील शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर मजुरांच्या रिकाम्या हातांना काम मिळणे कठीण झाले आहे. मजुरांना काम मिळावे, मजुरांचे आर्थिक उत्थान व्हावे, श्रमाची प्रतिष्ठा वाढावी, सदर कामाअंतर्गत शेततळे, वनतळे, बोडी, नाला, तलाव, खोलीकरण, कालव्याचे नूतनीकरण, भूमिगत बंधारे, मातीचे धरण आदी कामे व्हावीत, त्याद्वारे, शेतीला सिंचन व्हावे या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे त्यांचा आर्थिक सुबता नांदावी, शेतात जाण्याकरिता पांदण रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी व पाणी पुरवठा योजनासंबंधी रस्ते गावातील अंतर्गत रस्ते गाव रस्ते आदी विविध रस्त्यांच्या माध्यमातून लोकांची सोय व्हावीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती केली.
मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी मग्रारोहयो अस्तित्वात आली. अकुशल कामगाराने काम मागीतल्यास १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक असून न दिल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतुद कायद्यात आहे तसेच १५ दिवसांच्या आत केलेल्या कामाची मजुरी बँकेमार्फत देण्यात यावी, अशीही तरतूद आहे. ५0 टक्के कामे शासकीय यंत्रनेकडून व ५0 टक्के कामे जिल्हा परिषदेकडून करावयाची आहेत. भंडारा तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश खेड्यातील ६0 टक्के युवक नोकरी मिळेल या आशेने शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. (नगर प्रतिनिधी)