ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
By Admin | Updated: February 20, 2015 00:31 IST2015-02-20T00:31:13+5:302015-02-20T00:31:13+5:30
तीन भुखंडाला आकृषक करण्यास परवानगी देण्यासंबंधी मासिक व ग्रामसभेला विश्वासात घेतले गेलेले नाही. परस्पर ग्रामसेवकाने लेटर पॅडवर परवानगी दिली.

ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
जवाहरनगर : तीन भुखंडाला आकृषक करण्यास परवानगी देण्यासंबंधी मासिक व ग्रामसभेला विश्वासात घेतले गेलेले नाही. परस्पर ग्रामसेवकाने लेटर पॅडवर परवानगी दिली. परिणामी गावाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणीचे खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे यांना दिलेल्या तक्रारीतून उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे यांच्यासह तीन सदस्यांनी केली आहे.
भंडारा तालुक्याच्या पश्चिम सिमेवर असलेली खरबी (नाका) ग्रामपंचायत अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे. येथील सत्तारूढ सरपंच कमेटीवरील पायउताराचे प्रकरण तात्पुरते थांबत नाही. तोच आता ग्रामसेवकांविरूद्ध उपसरपंचाने सन २०१३ मधील तीन वर्षांचे प्रकरण पुढे करून चर्चेला उधाण आले आहे. यात उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे, सदस्य वाल्मिक मोथरकर, सुनिल मोथरकर, लता गोस्वामी यांनी ग्रामसेवक विरूद्ध पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांना तक्रार दिली. यात साईनाथ एग्रो इंडस्ट्रीजला त्यांच्या मालकीच्या भुखंड क्रमांक ४३४-१, ४३५-१ व ४३५-२ वर साईस मिल, पॉवर प्लाँट आणि आईल मिल उभारण्याकरीता कृषक जमीन अकृषक करण्यासाठी मासिक सभेत ठरावानुसार कमेटीने परवानगी दिली होती. मात्र औद्योगिक प्रायोजनार्थ ग्रामपंचायत ठरावानुसार ८ मे २०१३ अन्वये भुखंड क्रमांक ४३३-१, ४३३-२ व ४३४-२ ला परवानगी देण्यात आलेली आहे, असे ग्रामसेवकाने लेटर पॅडवर १९ नोव्हेंबर २०१३ च्या परवानगी पत्रात नमूद केले आहे. गुलशन कुकूटपालन संस्थेकडील थकबाजी ग्रामसेवकानी दडवून ठेवली. अवेश लियाकत शेख यांनी पीव्हीसी गिट्टी व दाना बनवणे असा अर्ज करून ग्रामपंचायतला परवानगी मागितली होती. ग्रामपंचायत कमेटीने नकार दिला असताना सुद्धा ग्रामसेवकांनी कमेटीला विश्वासात न घेता अवेश शेख यांना कुठलाही मासिक सभेत ठराव मंजुर न करता सदर अर्जदाराला परस्पर नाहरकत प्रमाणपत्र दिले, असे काम करणाऱ्या ग्रामसेवक व अधिकारी यांच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी खंडविकास अधिकारी यांच्याकडे उपसरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्याच्या सह्याद्वारे तक्रार अर्ज सादर करण्यात आले. या प्रकरणी ग्रामसेवक म्हणतात की, ठराव झालेला आहे. मात्र ठरावाची प्रत दाखवित नाही. (वार्ताहर)