जिल्हा बँकेकडून संयुक्त देयता गटांना सव्वा कोटीचे कर्ज वितरीत

By Admin | Updated: August 28, 2015 01:05 IST2015-08-28T01:05:28+5:302015-08-28T01:05:28+5:30

नाबार्डच्या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेऊन १२५ संयुक्त देयता गटांना ११२.४५ लक्ष रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले.

Delivering one crore rupees loan from the District Bank to the joint liability groups | जिल्हा बँकेकडून संयुक्त देयता गटांना सव्वा कोटीचे कर्ज वितरीत

जिल्हा बँकेकडून संयुक्त देयता गटांना सव्वा कोटीचे कर्ज वितरीत

सहकारी बँक मुंबईचे अध्यक्ष सुखदेवे यांची भेट
भंडारा : नाबार्डच्या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेऊन १२५ संयुक्त देयता गटांना ११२.४५ लक्ष रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष सुखदेवे यांच्या हस्ते कर्ज वितरीत करण्याचा कार्यक्रम बँकेच्या सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे हे होते. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सुखदेवे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक रामलाल चौधरी, श्रीकांत वैरागडे, विलास वाघाये, प्रशांत पवार, रामदयाल पारधी, प्रेमसागर गणवीर, राजू हेडावू, रुबी चढ्ढा, वासुदेव तिरमारे, रामराव कारेमोरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, नाबार्डचे डीडीएम अरविंद खापर्डे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक पाठक, माजी संचालक डॉ.प्रकाश मालगावे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना सरव्यवस्थापक किशोर बोबडे यांनी केली.
नाबार्डच्या सदर योजनेअंतर्गत बँकेनी पुढाकार घेऊन नाबार्ड पुरस्कृत एन.जी.ओ. नवनीत चेतना संस्था सोमलवाडा लाखनी यांचे मार्फत बँकेला ४०० संयुक्त देयता गट स्थापन करून खाते उघडलेले आहे.
४०० संयुक्त देयता गटापैकी बँकेनी मागील २ महिन्यात १२५ गटांना रु. ११२.४५ लक्ष कर्ज मंजूर केले आहे. त्यापैकी १० गटांना रु. ६.९५ लक्ष कर्ज वितरण शाखेमार्फत करण्यात आलेले आहे. उर्वरित गटापैकी आज ४७ गटांना रु. ४९.६५ लक्ष वितरण (चेकबुक) कार्यक्रमात वितरण करण्यात येत आहे. यामध्ये ४ गटांना केज कल्चर अंतर्गत रु. १०.०० लाखांचे कर्ज वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत कर्ज मंजूर गटांना कर्ज वितरणाची प्रक्रिया शाखा स्तरावर चालू असून यथाशिघ्र कर्ज वितरण करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.
नाबार्ड मार्फत जिल्हा बँकेला ४ फायनंशिलय लिटरशी सेंटर मंजूर केलेले आहे. त्यामध्ये भंडारा, तुमसर, पवनी व साकोलीया तालुक्याच्या ठिकाणी सदर सेंटर तयार करण्यात येणार आहे. नाबार्ड मार्फत सन १९९२ पासून स्वयं सहाय्य गट निर्मिती व बँक लिकेज कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बँकेनी एकूण ६१५३ गटाचे खाते उघडून ग्रामीण भागातील गरीब गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देवून त्यांच्या सर्वांगिण विकासाच्या प्रयत्नात सहकार्य करीत आहे. बँकेला नाबार्ड मार्फत एस.एच.पी.आय. अंतर्गत १००० स्वयं सहाय्य गट निर्मित व लिंकेज करण्याचा प्रकल्प मंजूर झाला. त्यामध्ये बँकेनी १००० बचत गटाचे बचत खाते उघडून ७८० गटांना अर्थसहाय्य रु. ६७३.०० लक्ष केलेले आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात. बँकेने त्याकरिता ५० प्रशिक्षण कार्यक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत.
स्वयं सहाय्य गटांचा पुढाचा टप्पा म्हणून नाबार्डने संयुक्त देयता गट स्थापना करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Delivering one crore rupees loan from the District Bank to the joint liability groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.