देव्हाडी उड्डाणपुलाला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:51+5:30
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देव्हाडी उड्डाणपुलाला गेले तडे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाला तडे गेल्याने एकाच खळबळ उडाली. हलक्या पावसात पुलावर लहान खड्डे पडले असून पुलाच्या मध्यभागातून लांब तडे गेल्याचे दिसत आहे. यामुळे पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राख वाहून गेल्याने पूल पोकळ होण्याची भीती निर्माण झाली आहे. दगडही खाली ढासळण्याची शक्यता आहे. आता तर पुलाच्या स्लॅबला मोठा तडा गेल्याचे दिसत आहे. हा प्रकार गंभीर असताना कुणाचेही लक्ष नाही.
शासन, प्रशासन गप्प
जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने २४ कोटींचा हा उड्डाणपूल बांधला जात आहे. संबंधित विभागाचा प्रतिनिधी आठ ते दहा दिवसातून एकदा भेट देतो. अन्य दिवशी कंत्राटदाराचे कर्मचारी काम पाहतात. त्यामुळे येथील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. निर्माणाधीन पुलाची ही अवस्था कशामुळे झाली हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्टेशनटोलीचे माजी सरपंच शाम नागापुरे, तुडकाचे माजी सरपंच सुदाम मानापुरे, खुशाल नागपुरे, संदिप बोंद्रे यांनी केली आहे.