वाहनाच्या धडकेत हरीण ठार
By Admin | Updated: January 16, 2017 00:25 IST2017-01-16T00:25:26+5:302017-01-16T00:25:26+5:30
रस्ता ओलांडीत असतांना कारने एका हरिणाला जोरदार धडक दिली. यात हरिणाचा जागीच मृत्यू झाला.

वाहनाच्या धडकेत हरीण ठार
घटनेची नोंद : जांभळी शिवारातील घटना
साकोली : रस्ता ओलांडीत असतांना कारने एका हरिणाला जोरदार धडक दिली. यात हरिणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास जांभळी जंगल शिवारात राष्ट्रीय महामार्गावर घडली. ती मादा असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
जांभळी गावालगत घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या मोठी असल्याने वन्यप्राणी इकडून तिकडे फिरत असतात. मात्र याच जंगलातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याचे इथून वाहन वेगाने जात असतात. या रस्त्याचे विस्तारीकरण अजुनही झालेले नाही.
याठिकाणी अनेक वन्यप्राणी अपघातात ठार झाले आहेत. हरीण रस्ता ओलांडत असताना साकोलीहून भंडाऱ्याकडे जाणारी कार क्रमांक एम एच ३६ एस ८०६५ ने तिला जोरदार धडक दिली. यात त्या हरीणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटनास्थळावर पोहचले. रविवार सुटीचा दिवस असल्याने शवविच्छेदन सोमवारला करण्यात येणार आहे, अशी माहिती जांभळीचे क्षेत्र सहायक बी. डी. सिंगाडे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)