मोहाडी येथे अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:42+5:302021-07-22T04:22:42+5:30

मोहाडी : अनेक दिवसांपासून आवश्यकता असलेल्या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण मंगळवारला आ. राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाहन ...

Dedication of fire fighting vehicle at Mohadi | मोहाडी येथे अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

मोहाडी येथे अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

मोहाडी : अनेक दिवसांपासून आवश्यकता असलेल्या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण मंगळवारला आ. राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाहन १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरपंचायत प्रशासक तथा उपविभागीय दंडाधिकारी नितीन सदगीर, मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे, माजी नगराध्यक्ष गीता बोकडे, माजी उपाध्यक्ष सुनील गिर्हेपुंजे, माजी नगरसेवक गणेश निमजे, नगरसेविका रागिणी सेलोकर, शोभा बुरडे, मनीषा गायधने, सायली पारधी, वंदना मेश्राम, प्रशासन अधिकारी गजानन नरवाडे, सिराज शेख, यशवंतराव बावणे, नरेश ईश्वरकर, नरेंद्र निमकर, अफरोज पठाण इत्यादी उपस्थित होते. मोहाडी व परिसरात आगीची घटना घडल्यास तुमसर, सनफल्याग वरठी, भंडारा येथून अग्निशमन दलाला बोलावे लागत होते, आता हे वाहन मोहाडीत उपलब्ध झाल्याने मोहाडीसह आजूबाजूच्या गावाला याचा त्वरित लाभ होईल.

Web Title: Dedication of fire fighting vehicle at Mohadi