पवनी तालुकासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:29 IST2021-05-03T04:29:47+5:302021-05-03T04:29:47+5:30
१ मे रोजी छोटेखानी समारंभ मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. विदर्भात रुग्ण सेवेचे काम करणाऱ्या विविध प्रतिनिधीकडे सदर रुग्णवाहिकेच्या किल्ल्या ...

पवनी तालुकासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
१ मे रोजी छोटेखानी समारंभ मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. विदर्भात रुग्ण सेवेचे काम करणाऱ्या विविध प्रतिनिधीकडे सदर रुग्णवाहिकेच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या. यापैकी एक रुग्णवाहिका भंडारा जिल्ह्यातील पवनी स्थित समर्पण बहुउद्देशीय सहकारी संस्था पवनीला मिळाली. स्व. संजय चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिका देण्याचे खा.सुनील मेंढे यांनी एका समारंभात कबूल केले होते. त्याची पूर्तता झाली. रुग्णवाहिकेची किल्ली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सोपविली. यावेळी नागपूरचे महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी, नितीन गडकरी, खा.सुनील मेंढे, समर्पणचे अजय चव्हाण, मोहन सुरकर, किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, संतोष घोशिकर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते विकास महामंडळाच्या सामाजिक निधीतून ह्या रुग्णवाहिका देण्यात आल्या. सदर रुग्णवाहिकेमध्ये व्हेंटिलेटर, बेड, ऑक्सिजन असे आधुनिक तंत्रज्ञान आहे. या रुग्णवाहिकेचे नियोजन भाजपचे तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांच्याकडे पवनी तालुक्यासाठी राहील.