कर्जाच्या परतफेडीनंतरही भूखंडाचे कागदपत्र देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:42 IST2016-06-30T00:42:26+5:302016-06-30T00:42:26+5:30
स्व:मालकीचा भूखंड 'मॉरगेज' करून स्थानिक स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथून चार लाख रूपयांचे कर्ज घेतले होते.

कर्जाच्या परतफेडीनंतरही भूखंडाचे कागदपत्र देण्यास नकार
दडपशाही कारभार : कर्जदार त्रस्त, स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथील प्रकार
ुतुमसर : स्व:मालकीचा भूखंड 'मॉरगेज' करून स्थानिक स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथून चार लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान कर्जदाराने कर्जाची मुळ रक्कम संपूर्ण व्याजासह पतसंस्थेला परत केली. तसी पतसंस्थेने एनओसी दिली आहे. मात्र 'मॉरगेज प्लॉट'चे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करून कर्जदाराला प्रताडित करण्याचा प्रकार तुमरात उजेडात आला आहे.
जितेंद्र किसन बोरकर (४०) रा. विनोबा भावेनगर, खापाटोली तुमसर असे त्रस्त झालेल्या कर्जदाराचे नाव आहे. गत दीड वर्षापुर्वी जितेंद्र बोरकर या इसमाने स्थानिय दुर्गानगर भंडारा रोड स्थित स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर या पतसंस्थेतून चार लाख रूपयांचे कर्ज 'प्लॉट मॉरगेज' करून उचलले होते.
दरम्यान ३१ मार्च रोजी १० हजार रूपये रोख व चार लक्ष ५० हजार रूपयाचे कोटक महिंद्रा बँकेचे धनादेश असे एकूण ४ लाख ६० हजार रूपये कर्जाच्या मुळ रक्कमेसह व्याजाचा एकमुस्त भरणा केला. २० मे रोजी स्रेह नागरी पतसंस्थेने जितेंद्र बोरकर याला चार लाख रूपये व त्यावरील व्याजाची पुर्णपणे परतफेड केली, तशी एनओसी तथा प्रमाणपत्र दिले. मात्र 'मॉरगेज प्लॉट'चे कागदपत्र देण्यास पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने असमर्थता दाखविली. त्यांनी अध्यक्षांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावर पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल घनश्याम लांजेवार यांना भेटले असता त्यांनी तुम्ही दुसऱ्या कर्जदाराचे 'गॅरंटर' असल्यामुळे कागदपत्र देता येणार नाही. त्यावर कर्जदाराने प्लॉटच्या विरुध्द गॅरंटर ठेवले होते का, असा सवाल विचारताच त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. कोणत्याही परिस्थिती कागदपत्र मिळणार नाही, असे लांजेवार यांनी बजावले.
जितेंद्र बोरकर याला त्याचेही कर्ज भर म्हणून धमकावले. त्यामुळे बोरकर शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी न्यायासाठी सहायक निबंधकाकडे तक्रार केली. पतसंस्था ही केवळ तुमसर पुरती मर्यादित असताना ग्रामीण भागातील नागरिकांना कर्ज वाटप केले कसे, असा आरोप दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यामुळे पतसंस्थेची योग्य चौकशी झाल्यास पितळ उघडे पडणार असल्याचे चिन्ह आहेत. (शहर प्रतिनिधी)
तक्रार मिळाली आहे. चौकशी करून लवकरच न्याय निवाडा लावण्यात येईल.
-पी. डब्ल्यु. भानारकर,
सहायक निबंधक, तुमसर.