दुष्काळ घोषित करून एकरी २५ हजारांची मदत द्या
By Admin | Updated: September 16, 2015 00:33 IST2015-09-16T00:33:39+5:302015-09-16T00:33:39+5:30
संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी,

दुष्काळ घोषित करून एकरी २५ हजारांची मदत द्या
शेतकरी संकटात : वाडीभस्मे यांची मागणी
साकोली : संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा या चक्रव्यूहात शेतकरी जीवन जगत आहे. मागील तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. याहीवर्षी सुरुवातीला दमदार पाऊस पडला. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ताच झाला. अधामधात पाऊस येतो व जातो.
मात्र शेतीला समाधानकारक पाणी अजुनही मिळाला नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी नाले, बोळ्या पुर्णपणे भरले नाही.
त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पिक वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र आता पुन्हा करपा व खोडकीडा या रोगाने धनपिकावर हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे.
यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)