वैनगंगा नदीपात्रात आढळला मृत अर्भक

By Admin | Updated: November 2, 2015 00:46 IST2015-11-02T00:46:34+5:302015-11-02T00:46:34+5:30

जवळच्या कारधा येथील वैनगंगा नदीच्या लहान पुलाखाली एका अर्भकाचे मृतदेह तरंगतांना आढळून आला.

The deceased infant found in the Wainganga river bed | वैनगंगा नदीपात्रात आढळला मृत अर्भक

वैनगंगा नदीपात्रात आढळला मृत अर्भक


भंडारा : जवळच्या कारधा येथील वैनगंगा नदीच्या लहान पुलाखाली एका अर्भकाचे मृतदेह तरंगतांना आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी ११.२0 वाजताच्या सुमारास उघडकीला आली.
बुधवारला दुपारी ३.३0 वाजता सुमारास दुचाकीवरून एक २२ वर्षीय तरुणी व ३0 वर्षीय युवक हे नवजात अर्भकासह नदीकाठावरील पायऱ्यांवर गप्पा मारत होते. दरम्यान, त्यांच्यात वाद निर्माण झाला. यात युवकाने त्या अर्भकाला पकडून एका पिशवीत घातले व पिशवी नदीत फेकून दिली. त्यानंतर ते दोघेही भंडाऱ्याकडे गेले, अशी चर्चा आहे. शनिवारी परिसरातील काही युवक नदीकाठी फेरफटका मारत असताना, अर्भक नदीपात्रातील कचऱ्यामध्ये अडकलेल्या स्थितीत आढळून आले. अर्भकाला बुधवारी नदीकाठावर आलेल्या त्या मुला-मुलीने फेकले असावे, अशी माहिती काही युवकांनी दिली. घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मासेमारांच्या मदतीने नदीतून मृत अर्भक बाहेर काढले. तपास सहायक पोलीस निरीक्षक रायपुरे करीत आहेत.
सहा महिन्यातील दुसरी घटना
सहा महिन्यापूर्वी याच पुलाखाली एक नव्हे तर दोन अर्भकांचा मृतदेह आढळून आला होता. परंतु, त्या अर्भकाचा शोध अद्यापही लागला नाही. नदीपात्रात अर्भक आढल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The deceased infant found in the Wainganga river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.