नहरात बुडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 15, 2014 22:51 IST2014-12-15T22:51:13+5:302014-12-15T22:51:13+5:30

पोहता येत नसतानाही हौस म्हणून नहराच्या पाण्यात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज (दि.१५) दुपारी २ वाजताच्या सुमारास नेरला उपसा सिंचनाच्या नहरात घडली.

Death of the youth by navigator | नहरात बुडून तरुणाचा मृत्यू

नहरात बुडून तरुणाचा मृत्यू

अड्याळ : पोहता येत नसतानाही हौस म्हणून नहराच्या पाण्यात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज (दि.१५) दुपारी २ वाजताच्या सुमारास नेरला उपसा सिंचनाच्या नहरात घडली.
संघदिप हिवराज मोटघरे (२३) असे मृतकाचे नाव आहे. तो नेरला येथील रहिवासी आहे. मृतक संघदिप हा मित्रांसह नेरला उपसा सिंचन नहर परिसरात फिरायला गेला होता. या सर्व युवकांना पोहता येत नसल्याने त्यांनी नहरातील पाणी व परिसरातील निसर्ग सौंदर्याची पाहणी केली. यावेळी पोहता येत नसतानाही संघदिप याला पोहण्याची हौस झाली. यामुळे त्याने कपडे काढून नहराच्या पाण्यात उतरत असताना सोबतच्या युवकांनी त्याला पाण्यात उतरण्यासाठी विरोध केला. मात्र मित्रांचे न ऐकता संघदिप पाण्यात उतरला.
नहरातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो तिथे उतरताच गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी नहराच्या पाळीवरील सोबतच्या मित्रांनी टाहो फोडून बघण्यासशिवाय काहीच केले नाही. याप्रकरणी त्यांनी अड्याळ पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून संघदिपचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी अड्याळ ग्रामीण रूग्णालयात पाठविले. दुदैवी घटनेमुळे नेरला गावात शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of the youth by navigator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.