मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:25 IST2018-05-13T22:25:41+5:302018-05-13T22:25:41+5:30
मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ सोनु प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.

मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ सोनु प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.
मित्राच्या लग्नाकरिता सोनू हा एकटाच मित्राच्या दुचाकीने अर्जुनी येथे गेला होता. परतीच्या प्रवासात शिवणीबांध वळणावर रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात झाला. ही घटना शनिवारला घडली. रविवारला सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्याच्याजवळ मिळालेल्या पत्यावरुन घरच्यांशी संपर्ककरुन घटनेची माहिती देण्यात आली. प्रथम भंडारा व नंतर नागपूरला उपचार करण्यात आले. पण सोनूचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. अपघात कसा घडला हे कळू शकले नाही. तलमले कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. वडील प्रकाश तलमले हे पोलीस विभागात सेवेत आहेत. सोनू हा मनमिळावू स्वभावाचा सुशिक्षीत तरुण असून त्याने शुध्द पाण्याच्या स्वयंरोजगार उभारला होता. त्याचे मागे वडील, आई, बहिण व असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.