अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

By Admin | Updated: November 26, 2014 23:01 IST2014-11-26T23:01:15+5:302014-11-26T23:01:15+5:30

चारचाकी वाहनाने आजीला रुग्णालयात नेत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरूण चालकाचा जागीच मृत्यू झाला. पराग मोहन टेंभुर्णे रा.भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे.

Death of a young man on an accident | अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

अड्याळ : चारचाकी वाहनाने आजीला रुग्णालयात नेत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरूण चालकाचा जागीच मृत्यू झाला. पराग मोहन टेंभुर्णे रा.भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना आज बुधवारला दुपारच्या सुमारास भंडारा-पवनी मार्गावरील नेरला वळणावर घडली.
परागाची आजी कमलाबाई टेंभुर्णे या पवनी तालुक्यातील चकारा येथे राहते. त्या आजारी असल्याने त्यांना उपचारार्थ दवाखान्यात न्यायचे होते. त्या हेतूने पराग हा एमएच-३१/झेड २४०८ ने चकारा येथे गेला. त्याच्यासोबत काकाचा मुलगा सौरभ टेंभुर्णे हा होता. आजीला घेवून चारचाकीने येत असताना नेरला वळणाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात पराग गतप्राण झाला. कमला टेंभुर्णे यांचा पाय मोडला. या घटनेत सौरभला दुखापत झाली. अड्याळ पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तपास विठ्ठल मोरे करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: Death of a young man on an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.