अज्ञात आजाराने दोन बहिणींचा मृत्यू

By Admin | Updated: September 9, 2014 00:11 IST2014-09-09T00:11:05+5:302014-09-09T00:11:05+5:30

रेंगेपार (कोठा) येथील रवींद्र काडगाये यांच्या ऋचिता (२ वर्ष) व श्वेता (६ वर्ष) या चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.

The death of two sisters by an unknown illness | अज्ञात आजाराने दोन बहिणींचा मृत्यू

अज्ञात आजाराने दोन बहिणींचा मृत्यू

लाखनी : रेंगेपार (कोठा) येथील रवींद्र काडगाये यांच्या ऋचिता (२ वर्ष) व श्वेता (६ वर्ष) या चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.
रवींद्र पतिराम काटगाये यांच्या ऋचिता व श्वेता या मुलींना रविवारी पहाटे ताप आल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न होता आणखी बिघडल्याने पुढील उपचाराकरीता नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान वाटेत त्यांचा ३ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. एकाच कुटूंबातील दोन सख्या बिहिणींचा मृत्यू झाल्याने काडगाये परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना कदाचित सर्पदंश झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death of two sisters by an unknown illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.