खतमिश्रित कुटार खाल्ल्याने तीन जनावरांचा मृत्यू

By Admin | Updated: October 18, 2015 00:10 IST2015-10-18T00:10:45+5:302015-10-18T00:10:45+5:30

रासायनिक खत विक्रीच्या गोदाम रिकामे करताना तेथील खत मिश्रीत कुटार शेतशिवारात फेकले.

The death of three animals due to eating Khatkar Kutar | खतमिश्रित कुटार खाल्ल्याने तीन जनावरांचा मृत्यू

खतमिश्रित कुटार खाल्ल्याने तीन जनावरांचा मृत्यू

कवलेवाडा येथील घटना : दोषीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा
तुमसर : रासायनिक खत विक्रीच्या गोदाम रिकामे करताना तेथील खत मिश्रीत कुटार शेतशिवारात फेकले. दरम्यान चराईकरिता सोडलेल्या जनावरांनी ते खाल्ल्याने त्या जनावरांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याला ८० हजार रुपयाचे नुकसान सोसावे लागले. ही घटना गुरुवारला सकाळी कवलेवाडा येथील पांढरी जागेवर घडली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गौपाले रा.कवलेवाडा असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. बलराम झाडू पेंदाम रा. कवलेवाडा असे अटकेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. कवलेवाडा येथे अग्रवाल यांच्या मालकीची परवानाधारक खत विक्री दुकानलगतच खताचे गोदामही आहे. खत गोदामात ठेवताना कुटार जमिनीवर अंथरूण त्यावर खतांच्या बॅग ठेवल्या जाते. खरीप पिकाचा हंगाम संपल्याने व गोदामध्ये ठेवलेल्या खताची विक्री झाल्याने खत गोदामाची सफाई १४ च्या सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. गोदामामधील कुटार ट्रॅक्टरमध्ये भरून ट्रॅक्टर चालक धुटेरा जवळील पांढरी जागेवर कवलेवाडा शेतशिवारात फेकून निघून गेला.
दरम्यान १५ रोजी सकाळी कवलेवाडा येथील शेतकरी अशोक गौपाले यांच्या मालकीची गाय, गोरा म्हैस असे ८० हजार रुपये किमतीचे जनावरे चरण्याकरिता सोडले असता त्यांनी ते कुटार खाल्ल्याने त्या जनावरांचा मृत्यू झाला. जनावरे अजूनपर्यंत घरी पोहचले नाहीत, म्हणून शेतकऱ्याने पाहणी केली असता गाई, म्हैस व गोरा मृतावस्थेत दिसून आला. त्यालगत कुटारही पडलेला दिसला व त्यातून खताचा दुर्गंध येत असल्याने शेतकऱ्याने पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार ट्रॅक्टरचालक बलराम पेंदाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार कृषी तांडेकर, राहुल गिरीपुंजे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The death of three animals due to eating Khatkar Kutar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.