स्वाईन फ्लू सदृश आजाराने आयुधनिर्माणी अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:41 IST2019-01-30T22:41:03+5:302019-01-30T22:41:16+5:30
येथील आयुध निर्माणीतील अधिकारी तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद जी. मेश्राम (४९) यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर संशयीत रुग्ण म्हणून उपचार सुरु आहेत.

स्वाईन फ्लू सदृश आजाराने आयुधनिर्माणी अधिकाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : येथील आयुध निर्माणीतील अधिकारी तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद जी. मेश्राम (४९) यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर संशयीत रुग्ण म्हणून उपचार सुरु आहेत.
विनोद मेश्राम हे आयुध निर्माणीत चार्जमन या पदावर कार्यरत होते. चार दिवसापूर्वी त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना आयुध निर्माणीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेता त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले होते. दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही संशयीत रुग्ण म्हणून रुग्णालयात उपचार घेत आहे. तर त्यांच्यासोबत देखभाल करीत असलेला आयुध निर्माणीतील कर्मचारी राजू गजभिये यालाही संशयीत रुग्ण म्हणून नागपुरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आयुध निर्माणीतील अधिकाºयाचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे माहित होताच प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.