बोदरा येथे आमरण उपोषण
By Admin | Updated: March 3, 2017 00:44 IST2017-03-03T00:44:01+5:302017-03-03T00:44:01+5:30
क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याजवळील तणसाचे ढिगारे व खातकुडा उचलण्यात यावा, या मागणीसाठी नॅशनल

बोदरा येथे आमरण उपोषण
समस्यांचे निराकरण करण्याची मागणी : दुसऱ्या दिवशीही उपोषणकर्ते मंडपात
साकोली : क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याजवळील तणसाचे ढिगारे व खातकुडा उचलण्यात यावा, या मागणीसाठी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन शाखा बोदरातर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
क्रांतीवीर बिरसामुंडा पुतळा परिसरात गावातील काही लोकांनी तणसीचे ढिगारे व खातकुडा जमा केला आहे. सदर परिसर मोकळा व स्वच्छ ठेवण्यात यावा असे निवेदन ग्रामपंचायत बोदरा, तहसिलदार, खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनाचा काहीच उपयोग झाला नाही. परिणामी बुधवारपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे.
सदर परिसर मोकळा करण्यात यावा, दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी उपोषण कर्त्याची मागणी आहे. या उपोषण मंडपाला नायब तहसीलदार मडावी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. या उपोषणात केशव मडावी, किशोर कंगाली, अकोश सयाम, रामदयाल कडपते, पामेश्वर पुरागकर, इश्वर वाढवे, होमनाथ पुरामकर, नारायण कळपते, ज्ञानेश्वर पुरामकर, प्रभुदास कळपते, उमेश परतेके, नरेश पंधरे, महादेव सयाम, अशोक कुंभरे, खेतराम पुरामकर, वासुदेव कंगाली, दुर्योधन पुरामकर, शालिक पुरामकर, उत्तम वाढवे, शंकर मडावी, रमेश सोळी, अनील मडावी, जगदीश वाढवे, रविंद्र पुरामकर व रमेश पंधरे यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)