विद्युत धक्याने लाईनमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:41 IST2017-11-19T23:40:03+5:302017-11-19T23:41:11+5:30
वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने वीजेच्या खांबावर चढलेल्या एका २४ वर्षीय लाईनमनचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला.

विद्युत धक्याने लाईनमनचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
पालोरा चौ. : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने वीजेच्या खांबावर चढलेल्या एका २४ वर्षीय लाईनमनचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. प्रणय प्रदीप घरडे रा. लोणारा असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोणारा शेतशिवारात घडली.
लोणारा येथील मोरेश्वर भेंडारकर यांच्या शेतशिवारातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामानिमित्त लाईनमेन प्रणय घरडे हे गेले होते. खांबावर चढले असताना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस हवालदार गणेश बिसने करीत आहेत.