वाहनाच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: March 9, 2015 01:18 IST2015-03-09T01:18:27+5:302015-03-09T01:18:27+5:30
शेतातील काम आटोपून गावाकडे जाणाऱ्या मोपेडस्वार युवकांना वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अ

वाहनाच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू
गावात शोककळा : चप्राड पहाडीजवळील घटना, अपघातांत वाढ, अपघात प्रवणस्थळ म्हणून फलक लावण्याची गरज
लाखांदूर : शेतातील काम आटोपून गावाकडे जाणाऱ्या मोपेडस्वार युवकांना वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात मोपेडवरील दोघांचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर-वडसा मार्गावरील चप्राड टेकडीजवळील वळणार आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
मुलचंद श्रावण ढोरे (२३) रा. आवळी व घनश्याम निवृत्ती मिसार (३०) रा. सोनी, असे मृतकांचे नाव आहे. सोनी येथील घनश्याम मिसार हे दुचाकी एमएच ३३ एन ४२३६ ने आसोला येथील शेतावर खताची बॅग पोहचविण्यासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून घनश्याम गावाकडे परतत असताना आसोला बस थांब्यावर उभ्या मुलचंदने त्याला 'लिप्ट' मागितली. दोघेही ओळखीचे असल्याने दुचाकीने सोनी गावाकडे निघाले. दरम्यान चप्राड पहाडीजवळ वडसाकडून येणाऱ्या भरधाव वाहन एमएच ३३ जी १९४३ ने दुचाकीला आमोरासमोर जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेली व दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील मुलचंद व घनश्याम या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहनचालक किरकोळ जखमी झाला. ग
अपघाताची माहिती मिळताच, पंचायत समिती उपसभापती नुतन कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी तातडीने मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
मृतक घनश्याम हा लाखांदूर येथील साखर कारखाना येथे रोजंदारी कामावर असून तो साकोली येथील कार्यालय सांभाळत होता. या अपघातस्थळी आतापर्यंत डझनभर अपघात घडले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने या स्थळावर अपघात प्रवणस्थळ म्हणून फलक लावण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुलचंदचा ‘लिफ्ट’ने घेतला जीव
४आवळी येथील मुलचंद हा बहिणीला पोहोचविण्यासाठी तिच्या सासरी आसोला येथे गेला होता. रात्र झाल्याने बहिणीकडे मुक्काम केला. सकाळी उठल्यावर बहिणीच्या हातचा चहा घेतला. यानंतर त्याने बहिणीला ‘येतो ग् ताई’ असे म्हणत घर सोडले. आसोला बस थांब्यावर बसची वाट बघत असताना घनश्याम एकटाच मोपेडने जात असल्याने त्याला ‘लिफ्ट’ मागितली. हीच त्याच्यासाठी दुर्दैवी बाब ठरली.
पोलिसांनी जपली माणुसकी
४अपघात घडल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी उसळली. मात्र, मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी कुणीच सरसावले नाही. यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी व सहायक पोलीस निरीक्षक निंबेकर यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रूग्णवाहिकेत ठेवून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. यावेळी नागरिकांनी मदतीचा हात न दिल्याने, माणुसकी हरपली तर नाही असे वाटत होते. मात्र पोलिसांच्या मदतीने माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती आली.
घनश्यामसाठी ठरली काळी पहाट
४घनश्याम हा आईवडीलांच्या म्हातारपणाचा एकुलता आधार होता. त्याला अवघ्या वर्षभराची मुलगी आहे. घरातील कर्ता असल्याने तो आसोला येथील शेतीवर नित्याप्रमाणे पहाटेच खताची बॅग घेऊन गेला होता. काम आटोपून मोपेडने तो निघला. दरम्यान आसोलाच्या बस थांब्यावर उभा असलेल्या मुलचंदने त्याला लिप्ट मागितली. दोघेही निघाले असता वाटेत त्यांच्यावर भरधाव वाहनरूपी काळाने झडप घातली.