वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू
By Admin | Updated: December 30, 2015 01:31 IST2015-12-30T01:31:46+5:302015-12-30T01:31:46+5:30
तालुक्यातील पिंपळगाव (सडक) ते मुरमाडी (तुपकर) मार्गावरील चिचटोला या गावाजवळ डांबरी रस्त्यावर काळवीट मृतावस्थेत आढळून आले.

वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू
चिचटोला येथील घटना
शिकारी टोळीवर संशय
लाखनी : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) ते मुरमाडी (तुपकर) मार्गावरील चिचटोला या गावाजवळ डांबरी रस्त्यावर काळवीट मृतावस्थेत आढळून आले.
जांभळी (सडक) वनपरिक्षेत्रामध्ये चिचटोला परिसरात मृतावस्थेत एक काळवीट पहाटे फिरणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आला. काळविटाच्या तोंडावर जखमा होत्या. सदर चितळाचा मृत्यू एखाद्या वाहनाच्या धडकेत झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वनविभागाचे दिनेश तिरपुडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले होते. पशुधन विकास अधिकारी डॉ.टेकाम यांनी शवविच्छेदन केले. त्यात काळविटाचा मृत्यू जखमा झाल्यामुळे सांगितले आहे. शिवणी, मोगरा, धाबेटेकडी परिसरात शिकार करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. या काळविटाला ठार केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्यामुळे हे काळवीट रस्त्यावर आणून फेकल्याची चर्चा आहे. काळवीट मृतावस्थेत आढळल्यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. (तालुका प्रतिनिधी)