रस्त्यावर फेकली जातात मृत जनावरे, आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:40+5:302021-03-31T04:35:40+5:30
गावचे पोलीस पाटिल यांनी पोलीस विभागाला वेळोवेळी माहिती देऊनही त्यावर कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे त्रस्त गावकऱ्यांनी केंद्रीय ...

रस्त्यावर फेकली जातात मृत जनावरे, आरोग्य धोक्यात
गावचे पोलीस पाटिल यांनी पोलीस विभागाला वेळोवेळी माहिती देऊनही त्यावर कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे त्रस्त गावकऱ्यांनी केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. संघटनेचे राष्ट्रीय चेअरमॅन डॉ. मिलींद दहिवले यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी व कार्यकर्त्यांनी कोकणागड (भंडारा) येथे जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांना त्या दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे आढळून आले. गत सहा महिन्यांपासून या रस्त्यावर वारंवार मेलेली जनावरे आढळत असून या बाबींकडे वन, पोलीस, आरोग्य विभागाचे कसे लक्ष गेले नाही? ही पण गांभीर्याची बाब आहे.जगभरात कोरोणाची साथ पसरलेली असताना व प्रत्येक नागरीक कोरोना विषाणुच्या दहशतीखाली असतांना गावकऱ्यांना घाणीच्या साम्राज्यात वास्तव्य करावे लागत आहे. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व नेत्यांचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सदर गंभीर बाबीची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने मोका चौकशी करावी, ती कुजलेली जनावरे गावापासुन दूर पुरविण्यात यावी, ती जनावरे जंगली तर नाहित ना? याचा शोध घेण्यात यावा. जर ती जनावरे जंगलातील नाहित तर अशी मेलेली जनावरे आणुन रस्त्याच्या कडेला फेकणाऱ्यांचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, कोकणागढ ग्रामवासियांना नेहमी होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करण्याकरीता सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपवनसंरक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार भंडारा, पोलीस ठाणे कारधा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर डॉ. देवानंद नंदागवळी, मंगेश हुमने, महेंद्र तिरपुडे, अनिल चचाणे, भीमराव बन्सोड, रमेश यावलकर, किरणकुमार नंदेश्वर, पोलीस पाटील घनश्याम निंबार्ते, संगीता नंदेश्वर, नरेश कावळे, तानबा मांढरे, प्रवीण शिरसाम, कारू भोयर, राहुल नंदेश्वर, अमोल कावळे, भूषण शहारे, दुर्गेश चाचेरे, संदीप डोंगरवार, राधेश्याम खंगार, परसराम चाचेरे, मंगेश कंगाले , विश्वशील टेंभेकर, प्रल्हाद बोदेले, तुळशीराम कांबळे, गीता नंदेश्वर, भूमिका नंदेश्वर, मयूर रामटेके, ज्योती नंदेश्वर, कविता नंदेश्वर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.