"त्या" आदेशात सुधारणा न केल्यास डीसीपीएस शिक्षक वेतनापासून वंचित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:19+5:302021-03-26T04:35:19+5:30
हा विषय फक्त डीसीपीएसधारक शिक्षक कर्मचारी यांच्यासंदर्भात असून, डीसीपीएसचे एनपीएसमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीसीपीएसधारकांच्या ...

"त्या" आदेशात सुधारणा न केल्यास डीसीपीएस शिक्षक वेतनापासून वंचित राहणार
हा विषय फक्त डीसीपीएसधारक शिक्षक कर्मचारी यांच्यासंदर्भात असून, डीसीपीएसचे एनपीएसमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचा आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीसीपीएसधारकांच्या वेतनातून डीसीपीएसची कपात न करता वेतन देयक सादर करण्याचे निर्देश देणे अत्यावश्यक आहे.
१० मार्च २०२१ ला निर्गमित केलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्याची गरज आहे, अन्यथा संपूर्ण राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना मार्च २०२१ च्या वेतनापासून वंचित राहावे लागणार असल्याचे आ. नागो गाणार यांनी नमूद केले आहे. मार्च २०२१ च्या वेतन देयकाबाबत शिक्षण संचालकांनी १० मार्च २०२१ ला केलेल्या आदेशात सुधारणा करून मार्च २०२१ चे वेतन १ एप्रिल २०२१ ला वितरित केले जाईल, याची व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक आ. नागो गाणार यांनी शिक्षण संचालकांना केली आहे.
फेब्रुवारीच्या वेतनाकरिता निधी नाही :
दुसऱ्या लॉटमध्ये वेतन देयक देणाऱ्या जिल्ह्यातील २४ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन निधीअभावी रखडले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावरच आता त्यांना वेतन मिळण्याची शक्यता आहे. कोरोना काळात नियमित वेतन शिक्षकांना मिळाले होते. परंतु सध्या मात्र निधीची कमतरता दिसत आहे.