रेती तस्करीने तई-भंडारा डांबरी मार्गाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:41+5:30
सदर मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गाची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या मार्गावरील तई गावाजवळ असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यातील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत.

रेती तस्करीने तई-भंडारा डांबरी मार्गाची दैनावस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा ते तई - बेलाटी या डांबरी रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गावरून आवागमण करण्याºया वाहन चालकांना तथा पादचाऱ्यांना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी रोजच या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून अनेकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर मार्ग हा बेलाटी, कोंढा, पवनी, आसगाव, भंडारा, नागपूर, उमरेड या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने याच मार्गाने वाहनचालक मोठ्या संख्येने आवागमन होत असते. या मार्गावरून रात्री बेरात्री कधीही वाहतूक सुरु असते. या मार्गावरून रेतीची माफियांचा धुमाकुळ सुरु असून दररोज शेकडो टिप्पर रेतीची तस्करी होत आहे. यात संबंधित विभागाचे चांगभले होत असल्याने कोणत्या अधिकाºयाकडे दाद मागावी आणि न्याय मिळावा अशी मागणी परिसरातील नागरिकांना येत नाही. यावर लोकप्रतिनिधींनी सुद्धा चुप्पी साधली आहे.
सदर मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गाची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या मार्गावरील तई गावाजवळ असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यातील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे आणि ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्ता बांधकामात अनियमितता !
रस्ता बांधकाम करताना निकृष्ठ साहित्यांचा वापर होत असल्याने रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा अंदाज रेती चोरटे करित आहेत. मात्र क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असल्याने रस्ते नादुरुस्त होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. एकीकडे खड्डे मुक्तची घोषणा तर दुसरीकडे खड्डेच खड्डे, यामुळे प्रश्न निर्माण होत आहे.
खड्डे जीवघेणे
गत महिन्याभरापासून रेतीची ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. या ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीमुळे अनेक डांबरी रस्ते पूर्णत: फुटले असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. सध्या महसूल विभागातील कर्मचारी विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत.