चारगाव बनले रेतीचे डम्पिंग केंद्र
By Admin | Updated: November 15, 2014 22:42 IST2014-11-15T22:42:03+5:302014-11-15T22:42:03+5:30
चारगाव येथे वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून गावाबाहेरील शेतात नियमबाह्य रेतीचे मोठे डम्पींग केंद्र तयार करण्यात आले होते. तेथून रेतीची उचल करून राजरोसपणे गोरखधंदा मागील

चारगाव बनले रेतीचे डम्पिंग केंद्र
तुमसर : चारगाव येथे वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून गावाबाहेरील शेतात नियमबाह्य रेतीचे मोठे डम्पींग केंद्र तयार करण्यात आले होते. तेथून रेतीची उचल करून राजरोसपणे गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू होता. तुमसर तहसीलदार यांच्या पथकाने सहा ट्रॅक्टरसह शेतमालक व रेतीची तस्करी करणाऱ्यांवर दीड लाखाचा दंड ठोठावून गुन्हे दाखल केले आहे.
तुमसर तालुक्यातील चारगाव येथील वैनगंगा नदीपात्रातून नियमबाह्यरित्या रेतीचा उपसा करून किरण बांडेबुचे यांच्या शेतात ठेवले जात होते. ही रेती विनापरवाना दुसऱ्या वाहनांच्या माध्यमातून भंडाराकडे वाहतूक केली जात होती. शुक्रवारी तहसीलदार सचिन यादव यांच्या नेतृत्वात डम्पींग केलेल्या ठिकाणी धाड घालण्यात आली. यात एमएच ३६/८१६७, एमएच ३६/८७७२, एमएच३६/सी-३५५५, एमएच ४०/ सी-१६८९ या वाहनासह दोन विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. सोबतच शेतमालक बांडेबुचे, विश्वनाथ बांडेबुचे यांच्यासह ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे नोंदवून दीड लाखांचा दंड वसूल केला. चारगाव येथील नदीपात्रात २४ तास रेतीचा उपसा होत असल्यामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहेत. (तालुका प्रतिनिधी)