डी.ए.पी. खतातील शेतीचा गुंता सुटता सुटेना
By Admin | Updated: August 30, 2016 00:19 IST2016-08-30T00:19:50+5:302016-08-30T00:19:50+5:30
आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डिएपी ग्रोमर गोदावरी नामक खतात रेतीचे प्रमाण अधिक आढळल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे.

डी.ए.पी. खतातील शेतीचा गुंता सुटता सुटेना
पथकाने केली खताची तपासणी : खत विक्रीवर तात्पुरती स्थगिती
चुल्हाड (सिहोरा) : आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डिएपी ग्रोमर गोदावरी नामक खतात रेतीचे प्रमाण अधिक आढळल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे. या खताच्या फवारणीमुळे शेती विषयक उपक्रमावर विपरित परिणाम होत आहे या शिवाय फळबाग शेतीला धोकादायक खत असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या खत खरेदी विक्रीचा हंगाम जोरात सुरु आहे. धान, फळबाग व भाजीपाला आदी उत्पादनाची जलद गतीने वाढ करण्यासाठी शेतकरी खताची खरेदी करीत आहे. अनेक कपंन्याचे खते बाजारात व कृषी केंद्रावर उपलब्ध झाली आहेत. सिहोरा परिसरात आंध्र प्रदेशात निर्मित होणाऱ्या डीएपी ग्रोमर गोदावरी नामक खताने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. या खताच्या बॅगमध्ये ४ ते ५ किलो रेती आढळून येत आहे. यामुळे ही रेती धोकादायक असल्याचे कारणावरुन शेतकऱ्यांचे वाढत्या तक्रारी आहे.
कृषी विभागाला या खताचे संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाचे पथकाने कृषी केंद्रावरुन खताचे नमुने तपासणी घेतले असता रेती आढळून आली आहे. दरम्यान खतात आढळणारी रेती भाजीपालचे रोपटे आणि शेतीला धोकायदायक आहेत किंवा नाही या करिता उच्चस्तरीय तपासणी करिता पाठविले आहे. या आधी कृषी विभागाचे पथकाने खताचे नमुने तपासणीकरीता पाठविले होते. परतु या खताचा अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. खतात रेतीचे प्रमाण आढळले असतांना तात्पुरती खत विक्रीवर स्थगिती देण्यात आली नाही. या खताची पुन्हा कृषी केंद्र धारकांनी विक्री करण्यास सुरुवात केली. खतात रेती आढळल्याने शेतकऱ्यांचे ठिंबक पंप, स्प्रे पंप मध्ये बिघाड आले आहे. अनेक स्प्रे पंप खरेदी करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला आहे.
परसवाडा येथील शेतकरी अंकुश बुलत लखन मोळे यांनी पुन्हा खतात रेती आढळल्याची तक्रार दिली आहे. पंचातय समितीचे कृषी अधिकारी जी. एन. बोरुले तथा मंडळ अधिकारी एस. डी. उईके यांचे पथकाने प्रत्यक्ष कृषी केंद्रावरुन या वादग्रस्त खताचे नमुने घेतले आहे. या खताचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे वाढत्या तक्रारी नंतर खताचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले आहेत. या खताची विक्री तात्पुरती स्थरावर थांबविण्यात यावी असे निर्देश कृषी केद्रधारकांना देण्यात येणार आहे. तपासणी अहवालावर अंतिम निर्णय घेता येईल.
-जी.एस. बोरुले, कृषी अधिकारी प.स. तुमसर
कृषी विभागाने कृषी सहायकानी या आधी शेतकऱ्यांचे शेतावर खताचे नमुने घेतली असून तपासणीकराित पाठविण्यात आले असून अंतिम अहवाल प्राप्तीनंतर निर्णय घेता येईल.
-एस. जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी, सिहोरा
रेती उष्णतेमुळे गरम होत असल्याने वांगेच्या रोपट्याला धोकायदायक आहे. या खतातील रेतीमुळे ठिंबक पंप व स्प्रे पंप मध्ये फवारणी करताना वारंवार तांत्रिक बिघाड येत आहे.
-अंकुश हुड, शेतकरी परसावाडा