ऊसाची धोकादायक वाहतूक

By Admin | Updated: December 29, 2016 02:10 IST2016-12-29T02:10:58+5:302016-12-29T02:10:58+5:30

सध्या ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली मधून ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Dangerous transport of sugarcane | ऊसाची धोकादायक वाहतूक

ऊसाची धोकादायक वाहतूक

पोलिसांचे दुर्लक्ष : ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्याची मागणी

अड्याळ : सध्या ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली मधून ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु त्यामुळे अपघातालाही निमंत्रण दिल्यासारखे वाटत आहे.
ट्रॉलीच्या मागे रिफलेक्टर नाही, लाईट नाही त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीचा प्रवास करणारे वाहनचालक ऊस ट्रॅक्टरमुळे धास्तावलेले आहेत व वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रॉलीला रिफलेक्टर त्वरीत लावावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहेत. ही वाहतूक अड्याळ पोलीस स्टेशन समोरून रोजच रात्री दिवसा होत असतानाही येथील ठाणेदार याकडे लक्ष देत नाही. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह येतो तेव्हा अपघात रोखण्यासाठी सप्ताहानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केल्या जाते, अशी चर्चा वाहनचालकात ऐकण्याला मिळते. जेव्हा गरज आहे त्याही वेळी जर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळले तर आज ही चर्चा झाली असती का? हाही एक प्रश्नच आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जानेवारी महिन्यात होतो तर ऊसाचा हंगाम नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सुरू होतो. अनेक ऊस ट्रॅक्टर चालक फक्त एकाच हेड लाईटचा वापर करताना दिसतात त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकांची फसगत होते. समोरून मोटार सायकल येत आहे या अंदाजाने वाहन चालवत असतात पण ट्रॅक्टर जवळ आल्यावर वाहनचालकाच्या लक्षात येते. त्यामुळे समोरून येणारी वाहने ट्रॅक्टरवर आदळण्याची दाट शक्यता असते तर दुसरीकडे सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेक लाईट नसतो फक्त रिफलेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. परंतु या सर्व गोष्टी ट्रॅक्टर चालकाकडून पूर्ण करवून घेणार कोण, आरटीओ विभाग ही याकडे दुर्लक्ष करत तर नसावा?
रस्ता सुरक्षा सप्ताहात एकूण एक माहिती पोलीस विभागाकडून सांगितली जाते. यातही शंका नाही. दरवर्षी अपघात रोखण्यासाठी या सप्ताहानिमित्ताने जनजागृतीसाठी मोठ मोठे कार्यक्रमसुद्धा घेण्यात येतात. सप्ताह येण्याआधीच जर या ट्रॅक्टरांना रिफलेक्टर लावले तर अपघात होण्यापासून वाचू शकतो. अन्यथा एखाद्याला जीव गमवावा लागण्याची सध्याच्या वाहतुकीवरून बघायला मिळत आहे. या ट्रॅक्टरचे दोन्ही हेड लाईट, रिफलेक्टर त्वरीत लावण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक तथा वाहनचालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Dangerous transport of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.