आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:27+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे.

Dangerous traffic resumes from interstate bridges | आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

Next
ठळक मुद्देदोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश : वाहनधारकांना अपघाताची शक्यता, जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी नदीवरील आंतरराज्य पुलाला हादरे बसत असल्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी या पुलावरून सर्वच वाहनांकरिता बंदी घातली होती. पुलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठीं नाली खोदली परंतु एका बाजूने बुजवण्यात आली. तिथून दुचाकी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
बावनथडी नदीवरील आंतरराज्य पूल धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी पूल बंद करण्याचे आदेश दिले पुलावरून जर मध्यम व हलक्या वाहनांना बंदी घालण्यात आली. सुरुवातीला पूल बंद करण्यात आला होता. परंतु तिथून दुचाकी किंवा चारचाकी वाहन वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. याप्रकरणी सर्वप्रथम लोकमत'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे ये-जा असते पर्यायी पूल म्हणून बपेरा राज्य मार्गाच्या वापर करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुमारे पंचवीस किलोमीटरच्या फेरा सदर नागरिकांना करावा लागतो.
वेळ पैसा लागत असल्यामुळे दुचाकीस्वारांनी येथे शक्कल लढविली. .पुलाच्या अलीकडे असलेली नाली त्यांनी बुजविली व तेथून आता दुचाकीची वाहतूक सर्रास सुरू आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास: वाहन धारक येथून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत मुलाची उंची जास्त आहे. मातीवरून वाहन जाताना तडे जाण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे तिथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने व पोलीस प्रशासन सुद्धा येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

दुरुस्ती केव्हा होणार
पुलावरून वाहतूक बंद होऊन आता पंचवीस दिवस झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून कोणत्याही प्रकारचे काम येथे सुरू केलेले नाही दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल असून सदर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची गरजेचे झाले आहे. र्वांनी बांधकाम विभागाचे नियोजन कमी पडल्याचे दिसत आहे. याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. विशेष म्हणजे २५ दिवसांपूर्वी पुल बंद करूनही कोणत्याही हालचाली या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळे दोन्ही राज्यातील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड असंतोष दिसत आहे. सदर पुलाची दुरुस्ती करून हा फुल वाहतुकीकरिता पवत करावा अशी मागणी चिखल्या चे माजी सरपंच दिलीप सोनवणे व माझे जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवणे यांनी केली आहे.

Web Title: Dangerous traffic resumes from interstate bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.