मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लॉकडाऊनचे कडक नियम असतांना व जिल्हाबंदीतही अत्यंत ज्वलनशील पेट्रोल टँकरवर बसून मजूरांनी नागपूर-गोंदिया दरम्यान प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांची नाकाबंदीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे लोंढे जात आहेत. मालवाहतूक वाहनाच्या छतावर गर्दीने मजूर जात आहेत. गुरुवारी पेट्रोल भरलेल्या टॅँकरवर सुमारे १२ ते १५ मजूर बसून गोंदियाकडे गेले. पेट्रोल हा अतिशय ज्वलनशिल द्रव पदार्थ आहे. तशा सूचना त्या टँकरवर लिहिलेल्या असतात. जीव धोक्यात घालून या मजूरांनी प्रवास केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.राष्ट्रीय व राज्यमार्गाने जातांना या मजूरांना कुणी बघितले नाही काय? जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. टॅँकरवर ते मजूर कसे बसले. सदर टॅँकर कोणत्या मार्गाने आला असे अनेक प्रश्न येथे अनुत्तरीत आहेत. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांना अनेकांनी बघितले. संचारबंदीचे सर्रास उल्लंघन येथे झाले. मोठ्या वेगाने हा टँकर येथून निघून गेला.तुमसर येथे संचारबंदीचे उल्लंघनखापा चौफुलीवरुन दररोज मालवाहतूक पीकअप वाहनात दाटीवाटीने व त्यावर बसून दररोज मजूरांची वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. नागपूरवरुन वाहनात कोंबून ते भंडारा येथे येतात व भंडारा येथून नंतर तुमसर मार्गे त्यांची वाहतूक सुरु आहे. पोलीस प्रशासनाने येथे कारवाई करण्याची गरज आहे.
लॉकडाऊ नमध्ये पेट्रोल टॅँकरवर बसून मजुरांचा धोकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST
गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे लोंढे जात आहेत. मालवाहतूक वाहनाच्या छतावर गर्दीने मजूर जात आहेत.
लॉकडाऊ नमध्ये पेट्रोल टॅँकरवर बसून मजुरांचा धोकादायक प्रवास
ठळक मुद्देजिल्हाबंदीवर प्रश्नचिन्ह। मालवाहू वाहनानेही सुरु आहे प्रवास