नृत्य शिबिर १० एप्रिलपासून

By Admin | Updated: April 5, 2015 00:53 IST2015-04-05T00:53:50+5:302015-04-05T00:53:50+5:30

लोकमत सखी मंचतर्फे दि. १० एप्रिल पासून येथील तकिया वॉर्ड स्थित ए वन लॉन येथे नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...

Dance Camp from 10th April | नृत्य शिबिर १० एप्रिलपासून

नृत्य शिबिर १० एप्रिलपासून

भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे दि. १० एप्रिल पासून येथील तकिया वॉर्ड स्थित ए वन लॉन येथे नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट युवती सदस्य १६ वर्षावरील मुली व महिला सहभागी होऊ शकतील. येथे लावणी, चित्रपट नृत्य, सेमीक्लासिकल, सालसा अशा विविध प्रकारचे नृत्य शिकविण्यात येतील.
सखी व युवा नेक्स्ट (युवती) सदस्यांकरिता २०० रुपये तर इतरांना ३०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. शिबिराकरिता दि. ५ ते १० एप्रिलपर्यंत नोंदणी करता येईल. नोंदणी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष वॉर्ड संयोजिकेकडे जाऊन करता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), मंगला डहाके (९६२३८०९००७), मनीषा मते (९७६४८८९३७४), वंदना डहारे (९४२१८८६३६७), मनीषा इंगळे (९७६५५४९०८), मनीषा रक्षिये (९४२०८६५८२७) व सोनाली तिडके (९४२३३८६११०) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Dance Camp from 10th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.