धरणाचा जलस्तर वाढला - बाधित गावे बुडण्याची भीती
By Admin | Updated: September 18, 2014 23:29 IST2014-09-18T23:29:22+5:302014-09-18T23:29:22+5:30
विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन

धरणाचा जलस्तर वाढला - बाधित गावे बुडण्याची भीती
गोसीखुर्द धरण : जलस्तर २३९.५०० मीटरवर पोहोचला
गोसे बु. : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसानंतर आज ३० सेंटीमिटरने धरणातील पाणायाची पातळी वाढून जलस्तर २३९.५०० मिटरवर पोहचला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बुडीत क्षेत्रातील अनेक गावे रिकामी करावी लागणार आहेत.
मागील वर्षी धरणातील पाण्याची पातळी वाढविण्यास सुरुवात झाल्यानंतर २३० मिटर म्हणजेच १० टीएमसी जलस्तर साठवणुकीचे उद्दीष्ट नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण करण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुुर ुहोते. जलस्तर २३९.२०० मिटरवर जाताच पाथरी मधील अनेक घरात पाणी शिरले होते. सावरगावच्या चारही बाजूने पाणी होवून या गावाला जाणारा एकमात्र रस्ताही बुडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आंदोलन करून जलस्तर वाढविण्याला विरोध करून जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटणार नाही व प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रुपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळणार तो पर्यंत गाव सोडणार नसल्याचा इशारा दिला होता.
प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होवून पाथरी मध्ये पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज झाला होता. त्यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. याचे पडसाद नागपूर हिवाळीअ धिवेशनात उमटले होते. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.१२५ मिटरवर स् थीर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गोसीखुर्दचा जलस्तर वाढविण्याचे काम १५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे.
रोज १० से.मी. ने जलस्तर वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिह्यातील ७ तर भंडारा जिल्ह्यातील ४ अशा एकूण ११ गावांना स्थानांतरीत करणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाथरी व सावरगावचा समावेश आहे. जामगावचे स्थानांतरण झाले आहे. प्रशासन पुनर्वसन विभाग सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही स्थितीशी निपटण्याची तयारी करून ठेवली आहे. (वार्ताहर)