ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:38+5:30
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे लाख, लाखोरी, हरभरा व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होणार असल्यामुळे नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते. अन्नधान्य पिकात गहू १ हजार १४ हेक्टर, मका ७४ हेक्टर, कडधान्यात हरभरा १ हजार २६२ हेक्टर, लाख, लाखोरी १ हजार ३३० हेक्टर, उडीद ५४८ हेक्टर, मूग ५२० हेक्टर, वटाणा १८१ हेक्टर, पोपट १९० हेक्टर, मसूर ४६ हेक्टर, गळीत धान्यात करडई २५ हेक्टर, भुईमूग ३. ५ हेक्टर, मसाला पिकात धने ९७ हेक्टर, मिरची ४७ हेक्टर, कांदा ६. ५ हेक्टर, भाजीपालाजन्य पिके ६४६ हेक्टर, पपई दोन हेक्टर, सोनबोरू २०१ हेक्टर, चारपिके १८७ हेक्टर असे एकूण ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात सतत ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे लाख, लाखोरी, हरभरा व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे.
ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कडधान्य पिके, मसाला पिके व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशक फवारणी करावी.
-एम. के. जांभूळकर, कृषी अधिकारी पंचायत समिती, लाखनी