भीषण आगीत साडेपाच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST2021-01-24T04:17:05+5:302021-01-24T04:17:05+5:30

राजू तुकाराम लोनबले रा. लाखांदूर (प्लॉट) असे घरमालकाचे नाव आहे. ते पत्नी व मुलीसह अनेक वर्षापासून कौलारु घरात वास्तव्यास ...

Damage of Rs | भीषण आगीत साडेपाच लाखांचे नुकसान

भीषण आगीत साडेपाच लाखांचे नुकसान

राजू तुकाराम लोनबले रा. लाखांदूर (प्लॉट) असे घरमालकाचे नाव आहे. ते पत्नी व मुलीसह अनेक वर्षापासून कौलारु घरात वास्तव्यास आहेत. लोनबळे कुटुंबाकडे इण्डेन कंपनीचे घरगुती वापराचे सिलिंडर आहे. दरम्यान २० जानेवारी रोजी रात्री ७ वाजता त्यांची पत्नी स्वयंपाक करण्यासाठी गेली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन भडका उडला. यात घराला भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे घर पूर्णत: जळून खाक झाले आहे. या घटनेत कुटुंबाचे सर्व संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले आहे. या दुर्घटनेची दखल घेत येथील तालुका प्रशासनाने स्थानिक तलाठ्यांना पंचनामा करण्यात सांगून नुकसानीचा अहवाल मागविला आहे. त्यानुसार येथील तलाठ्यांनी पीडित कुटुंबाचे जवळपास ५ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका प्रशासनाला सादर केली आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Damage of Rs