शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भंडारा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 9:51 PM

वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगार घोषित करून तशी नोंदणी सुरू करण्यात यावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : असंघटित कामगार म्हणून नोंदणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगार घोषित करून तशी नोंदणी सुरू करण्यात यावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.गत १२-१३ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी पाठपुरावा करीत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटीत कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली आहे. १६ जुलै रोजी नागपूर येथे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटले.त्यावेळी शिष्टमंडळाला मागण्यांविषयी आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी ७ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही.अखेर मंगळवारला वृत्तपत्र विक्रेत्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. सायंकाळीच्या सुमारास शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे, विजय निर्वाण, अरविंद शेंडे, नरेंद्र गौरी व पदाधिकारी यांच्यासह विशाल रणदिवे, केशव कुंभरे, वासुदेवे चोले, सुखदेव गोंधोळे, विलास केझरकर, शैलेश नाटकर, हेमंत निमजे, अजय मेश्राम, विश्वास कुंभरे, आहुजा डोंगरे, अरविंद शेंडे, चंद्रकांत श्रीकोंडवार, उमाकांत बारापात्रे, अनिल कोरे, कुंडलीक हिवसे, नितीन खोब्रागडे, रवि साठवणे, माणिकचंद टेंभरे, संजिव थोटे, देवेंद्र बानेवार, शंकर शरणागत, गिरीधर चवळे, राकेश गजभिये, देविदास मेश्राम, विजय पटले, युवराज गजभिये, मंगेश गजभिये यांच्यासह जवळपास ९० वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग होता.