दहेगावच्या रोजगार सेवकाला कामावरून काढले

By Admin | Updated: March 2, 2015 00:46 IST2015-03-02T00:46:26+5:302015-03-02T00:46:26+5:30

ग्रामपंचायत कार्यालय दहेगाव येथील ग्राम रोजगार सेवक प्रविण राखडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ...

Dahgaon's Employment Service was removed from the work | दहेगावच्या रोजगार सेवकाला कामावरून काढले

दहेगावच्या रोजगार सेवकाला कामावरून काढले

करडी (पालोरा) : ग्रामपंचायत कार्यालय दहेगाव येथील ग्राम रोजगार सेवक प्रविण राखडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामावरती बोगस मजूर दाखवून गैरव्यवहार केल्याचे चौकशी अहवालावरून निष्पन्न झाल्याने त्यांना कामावरून कमी करून नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती करण्याचे आदेश पंचायत विस्तार अधिकारी मोहाडी यांनी आमसभेच्या दिवसी सरपंचाला दिले.
मोहाडी तालुक्यात दहेगाव येथे मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामात रोजगार सेवक प्रविण राखडे यांनी पदाचा दुरूपयोग करिता गैरव्यवहार केल्याप्रकरणी पंचायत समिती अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. चौकशीत ते दोषी आढळल्याने व तसा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांचेवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र प्रकरण दबावात थंडबस्त्यात ठेवण्यात आले होते.
नागरिकांनी यासंबंधाने अनेकदा कारवाईची मागणी केली असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात होते.
२५ फेब्रुवारी रोजी मोहाडी पंचायत समिती येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले. आमसभेत प्रश्न उचलून धरले जाण्याचे संकेत दिसून आल्याने अखेर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांनी त्याच दिवशी तत्काळ रोजगार सेवकाला कामावरून कमी केल्याचे व शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावरून नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती करण्याचे पत्र दहेगाव सरपंचाला दिले.गावात चर्चेला उधान आहे. (वार्ताहर)

Web Title: Dahgaon's Employment Service was removed from the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.