सिलिंडर वाहतूक करणारे वाहन जप्त

By Admin | Updated: September 5, 2015 00:43 IST2015-09-05T00:43:25+5:302015-09-05T00:43:25+5:30

घरगुती वापरण्यात येणारे सिलिंडर चारचाकी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त भरुन शहरातील वर्दळीच्या ठिकाणातून वाहतुक करतांना आढळल्याने ....

Cylinders transported | सिलिंडर वाहतूक करणारे वाहन जप्त

सिलिंडर वाहतूक करणारे वाहन जप्त

तुमसर पालिकेने केली कारवाई : २५ हजारांचा दंड वसुल
तुमसर : घरगुती वापरण्यात येणारे सिलिंडर चारचाकी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त भरुन शहरातील वर्दळीच्या ठिकाणातून वाहतुक करतांना आढळल्याने पालिका प्रशासनाने चारचाकी वाहन सिलिंडरसह जप्त केला. यात २५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. अशा प्रकारच्या दंड वसुल करण्याची ही पहिलीच घटना आहे.
तुमसर ६० हजार लोकसंख्येचे शहर असून १५ हजारांच्यावर कुटूंब संख्या आहे. व्यावसायिक सिलेंडर वापरणारेही ५ हजारांच्यावर आहेत. महिन्यापोटी २० हजारांच्यावर गॅस सिलिंडरची उलाढाल करणारी एकमेव एचपीसीएल कंपनीची फेकार अ‍ॅन्ड आर.बी. एस.डी. ग्रुप तुमसर एजन्सी आहे. त्यामुळे २० हजार गॅस धारकांना घरपोच गॅस सिलिंडर पोहचवून देण्याची जबाबदारी एजेंसीची असल्याने एजेन्सीने एका वाहन कंत्राटदारावर गॅस सिलेंडर घरपोच पोहचविण्याकरिता कंत्राट दिला. मात्र त्या सिलिंडर वाहुन नेणाऱ्या चारचाकी वाहनाची कंपनीत नोंद केली नाही. पालिका प्रशासनाकडून गॅस सिलेंडर बाळगण्याचे वाहतूक करण्याची परवानगी घेतली नाही.
वाहतूक करणाऱ्या वाहनात अग्निशमन यंत्रणेचाही अभाव दिसुन आला. ही बाब मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांच्या लक्षात येताच स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या गाडीत स्फोट झाला किंवा वाहनातुन वाहतूक करतांना सिलिंडर खाली पडून मोठा अपघात होणे टाळता यावे व सुरक्षेचा उपाय म्हणून गॅस सिलेंडरसह वाहतूक करणाऱ्या एम.एच. ३६, एफ १३०६, एमएच ३५ के २०२९, एम एच ३६ एफ ११७६, एमएच ३६ -३०३५, एमएच ३६-५०१ हे चारचाकी वाहन जप्त केले व प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
वाहनात अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करवुन घेत पालिका प्रशासनाकडून परवाने घेण्याची ताकीद देवून सोडले. ही कारवाई मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात बाजार अतिक्रमण निरीक्षक सुनिल लांजेवार, प्रविण बोरकर, वहीद खान, जगदीश ठाकरे, सय्यद आबिद, निशिद शुक्ल, नरेश चौरागडे, बरकत शेख, जमिल शेख व चमुने केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Cylinders transported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.