जांब स्टेट बँकेतील कर्मचारी कमतरतेने ग्राहक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:45 IST2018-07-27T21:44:29+5:302018-07-27T21:45:47+5:30
मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे.

जांब स्टेट बँकेतील कर्मचारी कमतरतेने ग्राहक वैतागले
ठळक मुद्दे३० गावे : मजुरी सोडून दिवसभर उभे रहावे लागते बँकेच्या रांगेत
<p>लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे.
जांब शाखेशी परिसरातील ३० गावातील खातेदारांचा संपर्क दररोज येतो. विशेष म्हणजे या बँकेत सर्वाधिक खातेदार आहेत. मात्र दोन किंवा तीन कर्मचाऱ्यांवर येथील कारभार सुरू आहे. त्यामुळे येथे व्यवहारासाठी आलेल्यांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. महिन्याचा सुरूवातीच्या काळात पगारदार आणि सेवानिवृत्तांची गर्दी दिसून येते. तसेच विविध योजनेच्या मनधनासाठी वृद्ध लाभार्थी येथे येतात. त्यांना कोणतही सुविधा दिली जात नाही. परिणामी खातेदारामध्ये असंतोष पसरला आहे. खातेदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. याबाबत अनेकदा वरिष्ठांनाही सांगण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही. बँकेत कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे.
शासन जनतेला विविध प्रकारची सेवा देत असल्याने तसेच श्रावणबाळ संजय गांधी निराधारा योजनेचे पैसे, तेंदुपत्ता मजुरांचा बोनस रोजगार हमी कामाचे पेमेंट हे सर्व योजनेचे पैसे खातेदारांना बँकेतून मिळत असल्याने बँकेत गर्दी दिसून येते.
-ज्ञानेश्वर बारापात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक, जांब.