महावितरणवर ग्राहक धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:48+5:30

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कंपनीने रिडिंगच घेतले नाही. परंतु आलेले बिल दुप्पट तिप्पट आकाराचे आहे. यामुळे ग्राहक संतप्त झालेत.

Customers hit MSEDCL | महावितरणवर ग्राहक धडकले

महावितरणवर ग्राहक धडकले

ठळक मुद्देवीज बिलांची होळी : अव्वाच्या सव्वा बिलांवरून संताप, अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा बिल पाठविल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देवून वीज बिलांची होळी केली. महावितरण विरूद्ध रोष व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देवून वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या संदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी ‘वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे’, असे वृत्त प्रकाशित केले होते.
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कंपनीने रिडिंगच घेतले नाही. परंतु आलेले बिल दुप्पट तिप्पट आकाराचे आहे. यामुळे ग्राहक संतप्त झालेत.
सोमवारी येथील राष्ट्रीय महामार्गावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ग्राहकांनी धडक दिली. नितीन तुमाने यांच्या नेतृत्वात अनेक वीज ग्राहक धडकले. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरूद्ध रोष व्यक्त केला. लॉकडाऊनमुळे जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. अशा परिस्थितीत बिल पाहून पोट भरावे की वीज भरावे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी सोबत आणलेल्या विज बिलांच्या झेरॉक्सची होळी करण्यात आली. नितीन तुमाने, अंकुश वंजारी, प्रमोद केसलकर, यशवंत सोनकुसरे, सुधीर सार्वे, पवन मस्के, उमेश मोहतुरे, पलाश गोन्नाडे, निखिल धकाते, अवि हेडाऊ, मोहीत रणदिवे यांच्यासह अनेक वीज ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांच्या घोषणाबाजीने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अव्वाच्या सव्वा पाठविलेले वीज बिल माफ करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता राजेश नाईक दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
 

Web Title: Customers hit MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज