वनाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र
By Admin | Updated: February 17, 2016 00:16 IST2016-02-17T00:16:15+5:302016-02-17T00:16:15+5:30
मोहाडी तालुक्यातील शिवनी येथे ‘बनावट अंदाजपत्रकावर बांधले वनतलाव’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली आहे.

वनाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र
प्रकरण वनतलावाचे : कागदपत्र बदलविण्यासाठी धावपळ
भंडारा : मोहाडी तालुक्यातील शिवनी येथे ‘बनावट अंदाजपत्रकावर बांधले वनतलाव’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण अंगलट येणार या भितीने वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबाव आणने सुरू असून या प्रकरणाची सारवासारव सुरू झाली आहे.
मोहाडी तालुक्यातील जाम (कांद्री) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवनी येथे चार वनतलावांचे कामे करण्यात आली. ही कामे निकृष्ठ दर्जाची असून शासन नियम धाब्यावर बसवून करण्यात आले. वनतलाव बांधकामाच्या परवानगीसाठी वनाधिकाऱ्यांनी हिवरा बिटातील वनतलावे अंदाजपत्रक जोडून त्या कागदपत्रांवर चार वनतलांवाचे बांधकाम केले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वनाधिकाऱ्यांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. हे प्रकरण अंगलट येणार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांना दोषी पकडण्याचा घाट घातला आहे. दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वनमंत्र्यांना केली आहे. याप्रकरणी वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)