देवसराळ धुटेरात उसळणार भाविकांची गर्दी
By Admin | Updated: February 25, 2017 00:26 IST2017-02-25T00:26:15+5:302017-02-25T00:26:15+5:30
सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसराळा धुटेरा शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. या तीर्थस्थळी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हे विशेष.

देवसराळ धुटेरात उसळणार भाविकांची गर्दी
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भरते यात्रा
राहुल भुतांगे तुमसर
सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसराळा धुटेरा शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. या तीर्थस्थळी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हे विशेष.
तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या बावनथडी नदीच्या काठावर निसर्गरम्य सातपुडा पर्वत रांगेच्या कुशित पर्वतावर मोठ्या दगळांच्या गुफेतून प्रगट झालेले शिवलिंग व नंदीबैल अस्तित्वात आलेल्या देवसराळ धुटेरा येथे मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक पोहे घेवून नवस फेडण्याकरिता येथे येतात. दगळाच्या पर्वताला चिरून निघालेला शिवलिंग व त्यावर नागफणी सारखा दगळ हे सवांचे लक्ष वेधून होते.
१०० वर्षापूर्वीपासून हे शिवलिंग व नंदीबैल येथे अस्तित्वात आहेत. मात्र ये-जा करण्याची सुविधा नसल्यामुळे हे तिर्थक्षेत्र प्रकाश झोतात आले नव्हते. मात्र वयोवृद्ध व त्यांचा परिवारांचे लोंढे तिथे सातत्याने जात असल्याने अनेक लोक कुतुहलाने तिथे नावू लागले. तिथे बोललेला नवस हा हमखास पूर्ण होत असल्यामुळे कसलीही तमा न बाळगता भाविकांची गर्दी वाढू लागली व तिथे एक देवस्थान कमेटी निर्माण झाली व त्या आधारे भाविकांचा मिळालेल्या देणगीमुळे देवस्थानाला पुर्णजिवित करून पर्यटन घोषित झाला व काही प्रमाणात रस्त्यांची सुविधा झाल्याने हजारोंच्या संख्येने भाविक येथे येवून नवस फेडू लागले आहेत त्यामुळे या यात्रेला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
या ठिकाणी भक्ताकरिता शिवअभिषेक रामायणपाठ, दहीकाला किर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जाते तर भक्तांच्या मनोरंजनाकरिता झुले, खेळण्याची दुकाने, मनिहारी आदीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत.