मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

By Admin | Updated: December 12, 2015 00:31 IST2015-12-12T00:31:56+5:302015-12-12T00:31:56+5:30

मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणाऱ्या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली.

Cross-border trade in the name of massage parlor | मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

गणेशपूर येथे सुरू होता गोरखधंदा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चार महिला व चार पुरुष सापडले
भंडारा : मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणाऱ्या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सर्वोदय बहुउद्देशिय संस्थेच्या नावाखाली आयुर्वेद नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड फिजीयोथेरेपी उपचार व प्रशिक्षण केंद्र आहे. सदर केंद्र विद्यानगर परिसरात राहणारी मालू गणेश पिपरोदे (४५) ही महिला चालविते. या केंद्रात मदर अ‍ॅण्ड चाईल्ड मसाज सेंटरच्या नावाखाली याठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची गोपणीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारला दुपारी सापळा रचून धाड टाकण्यात आली.
यात साकोली, टाकळी आणि मुर्री जि. गोंदिया येथील महिला आढळून आली असून ईक्बाल गुलाब शेख (४४) रा.गांधी वॉर्ड भंडारा, प्रवेश दामोजी रंगारी (४१) रा.गांधी वॉर्ड भंडारा, प्रमोद ईस्तारी थोटे (३२) रा. जयस्तंभ चौक ता.मौदा, प्रशांत रघुनाथ भोयर (३६) रा.बोरगाव ता.मौदा जि.नागपूर या सर्वांना अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ चे कलम ३, ४, ५ (क) अन्वये कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक गौरव गावंडे, प्रीतलाल रहांगडाले, बंडू नंदनवार, राजेश गजभिये, सुधीर मडामे, रोशन गजभिये, सावन जाधव, कौशिक गजभिये, चेतन पोटे, बबिता चौरे, कल्पना आकरे, सिंधू गुरनुले, अपेक्षिणी गजभिये यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Cross-border trade in the name of massage parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.