कोट्यवधींच्या सदनिका भंगारावस्थेत

By Admin | Updated: April 24, 2017 00:52 IST2017-04-24T00:52:32+5:302017-04-24T00:52:32+5:30

चार दशकांपूर्वी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयांतर्गत बांधण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या सदनिका सद्यस्थितीत भंगारावस्थेत आहेत.

Crores of tenements are in the house | कोट्यवधींच्या सदनिका भंगारावस्थेत

कोट्यवधींच्या सदनिका भंगारावस्थेत

जागेचा उपयोग काय? : असामाजिक तत्वांचा वावर, व्यथा पशुसंवर्धन विभागाची
इंद्रपाल कटकवार भंडारा
चार दशकांपूर्वी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयांतर्गत बांधण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या सदनिका सद्यस्थितीत भंगारावस्थेत आहेत. येथील जिल्हा परिषद चौक ते गणगेशपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील उजव्या बाजुला या पडक्या व जुनाट सदनिकांमध्ये असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे.
शासनाच्या विविधांगी उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागानेही जनावरांचे आरोग्य तथा संरक्षणासाठी विविध योजनांतर्गत पाऊले उचलली आहेत. सन १९७७ मध्ये पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे (राज्यस्तर) गणेशपूरकडे जाणाऱ्या मार्गाच्या उजव्या बाजुला जवळपास अर्धा एकर जागेत कार्यालय, जिल्हा कूत्रिम रेतन केंद्र, सदनिका, पशु तपासणीगृह, गोडावून आदींचे बांधकाम करण्यात आले. सन १९९०च्या जवळपास या कार्यालयात कामकाज नियमितपणे सुरू होते. काही सदनिकांमध्ये कर्मचाऱ्यांचे वास्तव्यही होते.
महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पशुसंवर्धन कार्यालय असल्याने शेतकरी तथा पुशपालकांनाही सोयीचे होत होते. याच कार्यालयजवज़ कृत्रिम रेतन केंद्रही अस्तित्वात होते.
यासंबंधी साहित्यांचा पुरवठाही केला जात असे. कालांतराने या पशुसंवर्धन विभागातील काही पदे गोठविण्यात आली. याचवेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाजवळ पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय स्थानांतरीत करण्यात आले होते. हळुहळु जुन्या कार्यालयातील साहित्य नविन उपायुक्त कार्यालयात हलविण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तथा पशुपालकांचे येथे येणे-जाणे बंद झाल्याने कालांतराने जुनी इमारतीचेही हाल बेहाल झाले. सुविधांअभावी कर्मचाऱ्यांनीही सदनिका सोडली. आजघडीला जुन्या कार्यालय परिसरात कोट्यवधी रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या सदनिकांना भंगाराचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपी वाढली आहेत. शाचौलय, पाण्याच्या टाक्या, गटारे यामध्ये कचरा तुंबलेल्या आहेत. काही सदनिकांच्या बाहेरील भितींना तळे गेले आहेत. कार्यालयाची अवस्था दयनीय आहे.
‘हायवे टच’ असलेल्या या जागेत सायंकाळनंतर असमाजिक तत्वांचा वावर दिसून येतो. दारूच्या बाटल्या येथे दिसून येतात. दुकानातील तथा घरगुती कचराही येथे फेकला जात असल्याने आरोग्याची समस्या डोके वर काढत आहे. दुर्गंधीची समस्या कायम आहे. आजघडीला या जागेचा वापर मुतारीगृह म्हणून केला जात आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील या जागेचा सदउपयोग होणार काय? हाच खरा सवाल उपस्थित होत आहे.

साहित्य धूळ खात
सन १९७० च्या दशकात बांधकाम झालेल्या या कार्यालय परिसरात कृत्रिम रेतन केंद्राचे साहित्यही ठेवण्यात येत होते. कार्यालय स्थानांतरीत झाल्यावर उपयोगात असलेले साहित्य नेण्यात आले, परंतू आजही येथील कार्यालयात काही टबल, खुर्च्या, जुने दस्यावेजांचे गठ्ठे, कृत्रिम रेतनसाठी आणलेल्या काचेचे बॉटल्स, कार्यालयीन स्टेशनरी धूळ खात आहे. इमारतींचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.
कार्यालयआवारात दारूच्या बॉटल्या तर आतमध्ये मादक पदार्थांचे सेवन करित असल्याच्या खुणा आढळल्या. ‘लॅव्हेटरी’ची अवस्था बिकट आहे.

कार्यालय इमारत, सदनिका सभोवताल तारेचे कुंपण घालण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १९ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय कार्यालय दुरूस्ती व पाण्याच्या व्यवस्थेसाठी (बोअरवेल) अनुक्रमे १० व पाच लक्ष रूपयांची निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे येत्या काही दिवसात बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत.
- डॉ.ए.व्ही. वरारकर
पशुधन विकास अधिकारी
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र भंडारा.

Web Title: Crores of tenements are in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.