शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

शेकडो हेक्टरवरील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेकांकडे बोरवेलची सुविधा नाही. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नहराची नोंद आहे.

ठळक मुद्देठाणा येथील प्रकार : नाल्यावर बंधारा नाही, बांधकाम करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोलपंपलगत असणाऱ्या महामार्गालगत वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधकाम अनेक वर्षापासून झाले नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आजही बंधारा बांधकाम प्रतीक्षेत आहे.पावसाळ्यातील संततधार पावसाचे पाणी तसेच पेंच नहराचे पाणी येथील सांड नाल्यातून कोरंभीमार्गे वैनगंगा नदीला जावून मिळते. याच नाल्यावरून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू आहे. हा पूल ब्रिटीकालीन कालखंडातील आहे. नाल्याद्वारे वाहनारे पाणी बंधारा बांधकाम करुन थांबविल्यास परिसरातील जलसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे नाल्यावर शंभर फुट लांब व १५ फुट रूंद सिमेंट बंधारा बांधून परिसरातील शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना दिलासा देण्याची गरज आहे. ठाणा परिसरात अनेक विहिरींना उन्हाळ्यात पाणी राहत नाही. ठाणा परिसरातील ५०० हेक्टर शेतीला यामुळे कायमस्वरूपी सिंचनाची सोय होवू शकते.उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेकांकडे बोरवेलची सुविधा नाही. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नहराची नोंद आहे. मात्र उपकालवे अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. ठाणा शहापूर मार्गावरील स्मशानभूमीजवळच जुना ब्रिटीशकालीन पूल आहे. त्यामुळे शहापूर परिसरातील कोरडवाहू शेतीसाठी येथे बंधारा बांधल्यास लाखो क्युसेक पाण्याचा साठा होईल. परिसरात अनेक शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने परिसरात भाजीपाला पिकांची शेती करता येत नाही.शहापूर, ठाणा ग्रामपंचायतला पाणीपुरवठा होण्यास मदत होवू शकते. स्थानिक परिसरात रोजगाराच्या संधी कमी असल्याने नाल्यावर बंधारा बांधकाम करण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या हाताला काम नसून यामुळे अनेकांना यामुळे रोजगार उपलब्ध होवू शकतो. कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक जण मत्स्यव्यवसाय तसेच शेती आधारित व्यवसाय उभारू शकतात. येथून वाहणाऱ्या नाल्यावर नव्याने बंधारा बांधकामाची मागणी ठाणा व शहापूरवासीयांसह शमा मेश्राम, बबन बावनकुळे, मनोहर देशमुख, बादल मेहर, निखिल तिजारे, विषू पिंपळशेंडे यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरजभंडारा तालुक्यातील अनेक गावात आजही सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. शहापूर मंडळ अंतर्गत असणाऱ्या विविध गावातील शेतकरी आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका सहन करावा लागत आहे. शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना चांगल दिवस येतील.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती